रब्बी पिकाची मळणी अंतिम टप्प्यात

चिंबळी- खेड तालुक्‍यात औद्योगिक क्षेत्रात असलेल्या चिंबळी परिसरातील पंचक्रोशीत शेतकऱ्यांनी गेल्या चार महिन्यांपूर्वी रब्बी हंगामातील पेरणी केलेल्या गहू आणि ज्वारीच्या पिकाची काढणी करून मळणीची कामे अंतिम टप्प्यात आले आहे. कमी पावसामुळे यंदा गहू, ज्वारी आणि हरभरा पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे.

मरकळ, सोळू, धानोरे, मोशी, चल्होरी, केळगांव, चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे, डुडूळगांव, गोलेगांव, वडगांव आदी भागातील शेतकऱ्यांनी गेल्या चार महिन्यांपूर्वी कांदा लागवडीबरोबरच ज्वारी, गहू आणि हरभरा पीक घेतले होते. या पिकांना सुरुवातीला हवामान पोषक ठरले होते, पाणी मुबलक मिळाल्याने पिकाची वाढ चागंलीच झाली होती; परंतु नंतरच्या काळात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने दुष्काळाची झळ जाणवू लागली. विहिरीच्या पाण्याची पाणी पातळी घटल्याने पिकाला पुरेसे पाणी मिळाले नसल्याने पिकाची वाढ म्हणावी तशी झाली नाही. परिणामी तसे उत्पन्न मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याबरोबरच सध्या इंद्रायणी नदीचे पाणी दूषित असल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होऊ लागल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)