रब्बी पिकांवर दुष्काळाचे सावट; लागवडीत घट

File photo

पुणे – दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने चितांजनक ठरणार आहे, या हंगामातील हमखास समजले जाणारे हरभऱ्यांचे क्षेत्र यंदा मोठ्या प्रमाणावर घटले आहे. आतापर्यत फक्‍त 5.43 लाख हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.

रब्बीच्या हंगामात ज्वारी आणि हरभरा याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्याचबरोबर निरनिराळ्या डाळींचे उत्पादनसुद्धा याच हंगामात होते; पण यंदा ज्या भागात या पिकांची लागवड होते, त्याभागात दुष्काळाचे सावट आहे. मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील काही भागात डाळींचे पिक घेतले जाते. यंदा मात्र अद्याप हे प्रमाण घटणार असल्याचे चित्र दिसत आहे.

-Ads-

सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात हरभरा पिकांची मोठी लागवड केली जाते. सोलापूर जिल्ह्यात आतापासूनच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्याचा परिणाम लागवडीवर झाला आहे. आतापर्यंत हरभऱ्यांची लागवड ही फक्‍त 5.43 लाख हेक्‍टर झाली आहे. मागिल वर्षीही याच कालावधीत 10.37 लाख हेक्‍टरवर लागवड झाली होती, म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 52 टक्‍यांनी घट झाली आहे. याशिवाय चालू रब्बी हंगामात राज्यात आतापर्यंत 5.62 लाख हेक्‍टरवर डाळवर्गीय पिकांची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षी याच कालावधीत 10.61 लाख हेक्‍टरवर डाळवर्गीय पिकांची लागवड करण्यात आली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)