रब्बीतील ज्वारी पिकाची मळणी सुरू

चिंबळी-खेड तालुक्‍यात औद्योगिक क्षेत्रात असलेल्या निघोजे परिसरात ज्वारीच्या पिकाची काढणी सुरू झाली.
खेड तालुक्‍यात औद्योगिक क्षेत्रात असलेल्या कुरूळी, निघोजे, मोई, चिंबळी, केळगांव, परिसरातील शेतकरी वर्गाने गेल्या चार महिन्यांपूर्वी सोयाबीन पिकाची काढणी करून ज्वारीच्या पिकाची पेरणी केली आहे. या सुरूवातीच्या काही काळात हवामान पोषक ठरले होते; परंतु यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे काही शेतकरी वर्गाने पाणी दिले होते. त्यामुळे ज्वारीच्या पिकात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. पण मध्यंतरी काही हवामानात पुन्हा बद्दल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काळपट रोगाचा प्रादूर्भाव चिकटा निर्माण झाल्याने उत्पन्न घटले आहे. यावर्षी जनावरांना हिरवा चारा नसल्यामुळे कमी प्रमाणात असल्याने ज्वारीच्या कडब्यांना मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने तीन हजार रुपये शेकडा भाव असल्याने कडबा साठवणूक करण्यासाठी शेतकरी वर्गानी लगबग सुरू केली आहे या भागात शेतमंजुराची टंचाई असल्याने एकरी चार हजार रूपये मंजुरी देऊन पिकाची काढणी सुरू केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)