रफी, किशोर, मुकेश यांना स्वरांजली!

विक्रम प्रस्तापित: ऑर्केस्ट्रा मेलडी मिरॅकल्सचा उपक्रम

पिंपरी – हिंदी चित्रपटसृष्टीला अजरामर गीते देणारे मोहम्मद रफी, किशोर कुमार, मुकेश यांच्या स्मरणार्थ पी.चंद्रा प्रस्तुत ऑकेस्ट्रा मेलडी मिरॅकल्सद्वारे गीतगायन महोत्सवाचे आयोजन केले होते. चार कार्यक्रमातून 41 तासात 78 गायक, 27 गायिका, 22 निवेदकांनी 450 गाणी सादर करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

गीतगायन महोत्सवातील चौथा समारोप समारंभ पिंपरीतील संत तुकाराम महाराज मंदिरात नुकताच संपन्न झाला. यावेळी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत 1940 ते 2017 या कालखंडातील सर्व गायक कलाकारांची सुपरहिट्‌स गाणी सादर करण्यात आली. रफी, किशोर व मुकेश यांच्या प्रतिमेस चंद्रा पवार, पपिशकुमार ललगुनकर, रविंद्र कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी गायिका तृप्ती गुंजाळ, गायक शैलेश घावटे, यशवंत चव्हाण, केशव त्रिभुवन, शरद चव्हाण, मुकेश ललगुनकर उपस्थित होते. रफी, किशोर व मुकेश गीतगायन महोत्सवात दिलकी आवाज भी सुन, जिंदगी प्यार का गीत है, वो जब याद आये, ओल्ड इज गोल्ड आणि दो पल का शायर हूं या गाण्यांना रसिक श्रोत्यांनी भरपूर दाद दिली. या कार्यक्रमात काही व्यावसायिक व नवोदित गायक कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते.

पिंपरी-चिंचवड शहराचा सांस्कृतिक विकास प्रगल्भ व्हावा, नवोदितांना संधी मिळावी या उद्देशाने गीतगायन महोत्सवाचे आयोजन केले आहे. पार्श्‍वगायक रफी, किशोर, मुकेश यांच्या गाण्यामुळे आमची ओळख निर्माण झाली आहे, त्यांच्यामुळे आमचा उदरनिर्वाह होत आहे. त्या पार्श्‍वगायकांचे व त्यांच्या गाण्यांचे स्मरण कायम होत राहावे, नवनवीन गायक घडावेत अशी अपेक्षा चंद्रा पवार, शैलेश घावटे व रविंद्र कांबळे यांनी व्यक्‍त केल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहिनी पवार, सागर चव्हाण, केशव त्रिभुवन, दाऊद शेख, सतीश बारवकर, कृतिका गायकवाड, समिक्षा गायकवाड, फकिरा बोर्डे, संगिता पगारे, मंगला पवार, शिला गायकवाड, कविता कांबळे आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)