रनवेवरुन घसरलेले विमान गेले थेट समुद्रात विमानामधील सर्वजण सुखरुप

पापुआ न्यू गिनी – पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या पापुआ न्यू गिनीतल्या विमानतळावरून एक विमान घसरलं आणि ते थेट समुद्रात गेलं. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. मायक्रोनेशियात एका विमानतळावर विमानानं लॅंडिंग केल्यानंतर ते रनवेवरून धावत होतं. परंतु त्याच दरम्यान वैमानिकाचा विमानावरील ताबा सुटला अन्‌ ते थेट समुद्रात घुसलं. न्युगिनीच्या बोइंग 737-800 या विमानात ही घटना घडली असून, सर्व प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

विमान रनवेवरून 160 मीटरपर्यंत पुढे गेलं. या विमानात 36 प्रवासी आणि 11 क्रू मेंबर्स होते. ते सर्व सुरक्षित असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. पोलीस अधिका-यांच्या माहितीनुसार, विमानानं सकाळी 9.30 वाजता विमानतळावर लॅंडिंग केलं. त्याच वेळी ते धावत असताना रनवेवर न थांबता थेट समुद्रात घुसलं.

विशेष म्हणजे विमान सरळ समुद्रात गेल्यानंतर थांबलं. अधिकाऱ्यांनी सांगितले, की या वर्षी सुरवातीला आणखी एक विमान अपघात झाला होता. त्यानंतर हा अपघात झाला. या विमान अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)