रथोत्सवादरम्यान सर्व विभागांनी समन्वयातून काम करावे

म्हसवड : रथ यात्रा नियोजन समितीची बैठकीत मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, व इतर. (छाया ः विजय टाकणे)

प्रांताधिकारी यांच्या सूचना : म्हसवड रथ यात्रा नियोजन समितीची बैठक

म्हसवड, दि. 22 (प्रतिनिधी) – म्हसवड यात्राकाळात जनतेचे हित लक्षात घेऊन सर्व प्रशासकीय विभागांनी समन्वय ठेवून काम करावे. यात्राकाळात शांतता व सुव्यवस्था रहावी, यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले.
म्हसवड येथी रथ यात्रा 8 डिसेंबर रोजी होणार आहे. यानिमित यात्रा नियोजन समितीची बैठक दि. 22 रोजी श्रीसिध्दनाथ मंदिर सभागृहात पार पडली. आपत्ती नियोजनावर चर्चा करून पुढील काळात आपती येऊ नये, याची काळजी कशी घ्यावी यांच्या सुचना काबंळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
माणच्या तहसीलदार बाई माने, माजी नगराध्यक्ष अजितराव राजेमाने, नगराध्यक्ष भगतसिंग विरकर, डीवायएसपी अनिल वडणेरे, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम उप अभियंता गायकवाड, एन. पी., जि. प. आरोग्य विभाग असि. डी. एच. ओ. डॉ. व्ही. के. फाळके, वीजमंडळ एस. एम, शेट्टी, एस. टी. विभाग वाहतुक नियंत्रक श्रीमती यादव, मुख्याधिकारी पंडीत पाटील, नगरसेवक धनाजी माने, माण तालुका भाजपा अध्यक्ष बाळासाहेब मासाळ, माजी नगर सेवक यूवराज सुर्यवंशी, दतात्रय गुरव, (होंकारे,) नगरसेवक गणेश रसाळ, पृथ्वीराज राजेमाने, सालकरी किर्तने, उप अभियंता शेळके, नगरसेवक विकास गोंजारी, नगरसेवक शहाजी लोखंडे, नगरसेवक कारंडे उपस्थित होते.
यावेळी विविध मुद्यावर नियोजन करण्याच्या सुचना प्रांताधिकारी यांनी दिल्या व भाविकांच्या सोयीसाठी करावयाच्या उपायाबाबत आढावा घेण्यात आला. पाणी तपासणी करणे, रस्त्यावर दिशादर्शक फलक लावणे, साईड पट्टयावर मुरुम भरणे, पाण्यात जंतुनाशक वापर करणे, साथीचे रोग नियंत्रण करण्यासाठी काळजी घेणे, मागील वर्षी डेंग्यू, चिकूनगुण्या रोगाची साथ होती. हे रोग येऊ नयेत यासाठी अधिक काळजी घेणे, यात्रेत दुकाने परवाने देताना व वीज पूरवठा करताना दक्ष रहावे. यात्रेसाठी स्वतंत्र वीज व्यवस्था करणे, यात्रा नियंत्रण कक्ष स्थापन करून सोय करणे, जबाबदार व्यक्ती उपलब्ध करुन देणे आवश्‍यक आहे. पर्यायी रस्ता निर्माण करण्याच्या सुचनाही करण्यात आल्या.
शहर परिसरातील विजेची तपासणी केली असून यात्राकाळात 24 तास वीज पुरवठा करू, असे वीज अभियंता यांनी सांगितले. तसेच दहिवडी, म्हसवड, गोंदवले, लाईनमन नेमणार असून वीजतारा तपासणीचे काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
आरोग्य विभागातर्फे आरोग्य पथके, 8 आरोग्य अधिकारी नेमले आहेत. शहर परिसरात 39 विहीरीचे पाणी तपासणी केली. एस. टी. विभागातर्फे 150 जादा बस फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. दहिवडी, म्हसवड, ज्यादा गाड्या मागवण्यात आल्या आहेत. संपर्क केंद्रे करण्यात येणार आहेत. फिरते स्वच्छालय ठेवण्याचे नियोजन केले आहे. पोलीस निरीक्षक मालोजी देशमुख यांनी शांततेसाठी आवाहन करून यात्रा काळात अवैध धंद्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी सालकरी, रथाचे मानकरी उपस्थीत होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)