रत्नागिरी, देवगडच्या नावावर कर्नाटक हापूसची विक्री

ग्राहकांची फसवणूक


किरकोळ व्यापारी होतायेत मालामाल

पुणे- अक्षय तृतीयेसाठी रत्नागिरी हापूस आंबा खरेदी करताय. सावधान. तुमची फसवणूक होऊ शकते. सध्या मार्केट यार्डात आणि शहरातील ठिकठिकाणच्या किरकोळ विक्रेत्यांकडून रत्नागिरीच्या नावावर कर्नाटक हापूसची विक्री करण्यात येत आहे. दोन्ही आंबे दिसण्यास एकसारखेच असल्याने व्यापाऱ्यांचे फावत आहे. मात्र, दोन्ही आंब्याच्या चवीमध्ये फरक आहे. रत्नागिरी आंबा अधिक मधुर असतो. घरी घेऊन गेल्यानंतर आंबा मधुर नसल्याने रत्नागिरीच्या नावावर कर्नाटक व्यापाऱ्यांनी दिल्याचे ग्राहकाला कळते. त्यावेळी खूप उशीर झालेला असतो. ग्राहकाला चुप बसण्याशिवाय पर्याय नसतो.
सध्या आंब्याचा हंगाम सुरु झाला आहे. मधुर चवीमुळे सहाजिकच रत्नागिरी, देवगड हापूसला अधिक मागणी असते. त्या तुलनेत कर्नाटकला कमी मागणी असते. कर्नाटक आंबा तुलनेत स्वस्त असतो. बाजारात कर्नाटक आंब्याची जास्त आवक होत असते. रविवारी मार्केट यार्डात 10 ते 11 हजार पेट्यांची कर्नाटक हापूसची आवक झाली आहे. तर रत्नागिरी, देवगड हापूसची मिळून 4 ते 5 हजार पेट्यांची आवक झाली. आवकेच्या विचार केल्यास रत्नागिरी, देवगडची केवळ 20 ते 30 टक्केच आवक आहे. त्या तुलनेत मागणी जास्त आहे.
येत्या बुधवारी (दि.18) अक्षयतृतीया आहे. या मुहूर्तांवर हंगामातील आंबा खाण्यास सुरुवात करणाऱ्या पुणेकरांची संख्या मोठी आहे. परंतु सध्या कोकणातील हापूसच्या नावाखाली कर्नाटक हापूसची विक्री करून व्यापाऱ्यांकडून पुणेकरांची फसवणूक केली जात आहे. गेल्या दोन-तीन वर्षात पुणे शहरामध्ये सर्वत्र गल्ली-बोळात रस्त्यांवर कर्नाटक हापूसची विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. तर मार्केट यार्डमध्ये देखील रत्नागिरी, देवगड हापूसचे केवळ 4 ते 5 होलसेल विक्रेते असून, कर्नाटक आंब्याची विक्री करणारे तब्बल 15 हून अधिक होलसेल व्यापारी आहेत. शहरात, मार्केट यार्डमध्ये देखील
कर्नाटक हापूसची विक्री देखील सरास कोकणचा हापूस नाव असलेल्या पेटीमधून केली आहे. त्यामुळे हा आंबा नक्की रत्नागिरीचा का कर्नाटकचा हे लक्षात येत नाही. रत्नागिरी, कर्नाटक हापूसच्या भावामध्ये मोठा फरक असतो. सध्या बाजारात रत्नागिरी हापूसचे भाव घाऊक बाजारात प्रती डझन 600 ते 700 रुपये असून, कर्नाटक हापूचे भाव 400 रुपयांपासून 500 रुपये डझनापर्यंत आहेत. परंतु कर्नाटक हापूची विक्री देखील रत्नागिरी हापूसच्या भावाने केली जाते. यामुळे पुणेकरांची फसवणूक सुरु आहे.

रत्नागिरी, देवगड आणि कर्नाटक हापूस दिसण्यास एकसारखे आहेत. त्यामुळे त्यातील फरक ओळखणे सामान्य ग्राहकांला अवघड आहे. आंब्याची साल, वास बारकाईने तपासणे ग्राहकास शक्‍य होत नाही. सामान्य ग्राहक हा फक्त म्हणतो की, मला रत्नागिरी हापूस पाहिजे आहे. याचाच फायदा घेत किरकोळ व्यापारी उचलतात आणि कर्नाटक हापूस, इतर प्रकारचे आंबे रत्नगिरीच्या नावावर दिले जातात. हे आंबे रत्नागिरी, देवगडपेक्षा स्वस्त असतात. त्यामुळे एकीकडे ग्राहकाची फसवणूक होते. तर दुसरीकडे हे विक्रेते अधिक नफा मिळवितात.

– नाथसाहेब खैरे
                     – मार्केट यार्डातील रत्नागिरी हापूसचे आडते


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)