रत्नागिरीत कार नदीत कोसळली, चार जण बेपत्ता!

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कार नदीत वाहून गेल्याने चार जण बेपत्ता झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरच्या धामणी गावाजवळच्या यादववाडी परिसरात आज सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला.

रत्नागिरीहून चिपळूणच्या दिशेने निघालेल्या इनोव्हा कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने, कार थेट माहामार्गाच्या बाजूने वाहणाऱ्या आसवी नदीत कोसळली. अपघातावेळी कार चालक नदीत फेकला गेल्याने, ग्रामस्थांनी त्याला वाचवलं. मात्र कारमधील इतर चार जण बेपत्ता आहे. कारने नदीचा तळ गाठल्याने ती दिसतही नाही. स्थानिक पोलिस, तटरक्षक दलाचे जवान आणि एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने नदीपात्रात बचावकार्य सुरु आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)