रत्नागिरीतील अपघातात सांगलीचे दोघे ठार

कोल्हापूर – रत्नागिरीतील हातखंबापासून दोन किलोमीटर अंतरावर निवळी गावानजीक दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दोघेजण ठार झाले तर एकजण गंभीर जखमी आहे.

हा दुर्दैवी अपघात मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास झाला.अनिल विजय शिरोटे (वय 35) आणि रोहित रावसाहेब शिरोटे (वय 28 रा दोघेही कवठेएकंद तासगाव) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. तर निवास आनंद थोरात (वय 27 रा कवठेएकंद) हा गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले आहे. अपघातात दीपक भुपाळ शिरोटे (वय 27 रा. कवठेएकंद) किरकोळ जखमी झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)