रत्नदीप मेडीकल फाऊंडेशन ऍण्ड रिसर्च सेंटर

नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील जामखेडसारख्या शैक्षणिक दृष्ट्‌या अविकसित व नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या तालुक्‍यात रत्नदीप मेडीकल फाऊंडेशन ऍण्ड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे डॉ. भास्करराव मोरे पाटील यांनी ग्रामीण भागातील मुलां-मुलींना वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडवता यावे, यासाठी जामखेड येथे वैद्यकीय, फार्मसी, नर्सिंग असे विविध अभ्यासक्रम असणारे कॉलेज सुरू करून जामखेड तालुक्‍यात एक शैक्षणिक चमत्कारच घडवला आहे.
जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात आता प्राधान्याने घेतले जाणारे नाव म्हणजे रत्नदीप मेडीकल फाऊंडेशन ऍण्ड रिसर्च सेंटर. डॉ. मोरे पाटील यांनी आपले M. D. (Hom.) Ph. D. पर्यंतचे शिक्षण घेत असतानाच एका सामाजिक जाणीवेतून आपल्या भागातील मुलांना वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेता यावे म्हणून जामखेड येथे वैद्यकीय, फार्मसी, नर्सिंग ईत्यादी विविध कॉलेज सुरू केले असून या ठिकाणी भव्य अशी मोठी इमारत उभी राहत आहे.
डॉ. मोरे पाटील यांच्या राजकीय जीवनाला वेगळ्याच अनुभवातून सुरूवात झाली. ते राज्यातील होमिओपॅथी डॉक्‍टरांच्या संदर्भात एक निवेदन देण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी गेले असता. अजितदादांची कामाची पद्धत पाहून डॉ. मोरे हे कमालीचे प्रभावीत झाले. यामुळे 2000 सालापासून त्यांची अजितदादांचा कट्टर समर्थक कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे काम करण्यास सुरू केले. त्यांना 2002 ते 2006 या काळात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा जिल्हा कार्याध्यक्ष व त्यानंतर प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या दरम्यान त्यांना प्रवरा मेडिकल ट्रस्ट बरोबर काम करण्याची संधी मिळाली.हे प्रशिक्षण घेत असतानाच जिल्ह्यातील बालमृत्यू व मातामृत्यू हा गंभीर विषय समोर आला. जामखेड व कर्जत तालुक्‍यात हे प्रमाण खूपच होते. याचं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे घरी होणाऱ्या प्रसूती. त्याकाळी वैद्यकीय सुविधांचा अभाव होता. प्रशिक्षित नर्स नसायच्या. त्यामुळे प्रसुती घरच्या घरीच करण्याकडे कल असायचा. बाल व महिला मृत्यू टाळायचे असतील तर आपणही संस्थेमार्फत काहीतरी केले पाहिजे, असे वाटू लागलं. त्यातूनच नर्सिंग महाविद्यालयाची संकल्पना पुढे आली. मग नर्सिंग कॉलेज सुरू झाले. यामध्ये ग्रामीण भागात नर्सेस उपलब्ध करून देण्याचा हेतू होता. तो साध्य करण्यासाठी संस्थेच्या वतीने गाव तेथे नर्सिंग सेवा हे अभियान राबविण्यात आले. त्याचा लोकांना खूप फायदा झाला. गावपातळीवरील महिला, बालके, युवक-युवती, नवविवाहित जोडपी यांना मार्गदर्शन केलं जायचं. प्रसूतीसाठी जामखेडला नाव नोंदणी करणं महिलांसाठी सोप झालं. डॉ. मोरे पाटील यांचे हे प्रयत्न पाहुन मॅगेसेसे ऍवॉर्ड विजेते डॉ. रजनीकांत आरोळे यांनी जीएनएम नर्सिंग कोर्स सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यानंतर जीएनएम हा अभ्यासक्रम सुरू झाला. पुढे बीएस्सी नर्सिंग कॉलेज देखील सुरू झाले. दरम्यान याच काळात “रत्नदीप कॉलेज ऑफ आर्टस्‌, कॉमर्स ऍण्ड सायन्स’ महाविद्यालयास मंजुरी मिळाली.
एवढ सगळ झाल्यानंतरही मनात रूख रूख होती. ती होमिओपॅथी कॉलेजची. यासाठी डॉ. मोरे पाटील यांनी प्रयत्न सुरू केले. अनेक प्रयत्नानंतर ऑक्‍टोबर 2017 मध्ये होमिओपॅथी कॉलेजसाठी राज्य शासन, आयुष मंत्रालय, केंद्रीय होमिओपॅथी कॉन्सिल आणि वैद्यकीय शिक्षण विभाग अशा आवश्‍यक त्या सर्व मान्यता मिळाल्या. शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून पदवी फार्मसी व पदविका फार्मसी हे नवीन कॉलेज अनुक्रमे शंभर व साठ विद्यार्थी क्षमतेसह सुरू झाले आहेत. दरम्यान, कर्जत रोड लगत रत्नापूर गावच्या हद्दीत 20 एकर जमिनीवर भव्य अशी इमारत उभी राहत आहे. यापुढेही याठिकाणी आयुर्वेदिक कॉलेज व एक ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणारं मल्टि सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल सुरू करण्याचा डॉ. मोरे पाटील यांचा मानस आहे. यातून एकच सिद्ध होते की, जिद्द व चिकाटी यांचा अनोखा संगम माणसाला निश्‍चितच यशोशिखरावर नेतो आणि याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे डॉ. मोरे पाटील होय.
या सर्व कामात डॉ. मोरे यांच्या पत्नी डॉ. वर्षा मोरे पाटील या त्यांच्या खांद्याला खांदा लावून सर्व जबाबदारी पार पाडत आहेत. आजही रत्नदीप मेडीकल फाऊंडेशन अंतर्गत असलेल्या सर्व युनिटचे काम त्या प्रभावीपणे सांभाळत आहेत. या संस्थेच्या माध्यमातून जे काही उभे राहिले त्यामध्ये डॉ. वर्षा मोरे पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे.
रत्नदीप मेडीकल फाऊंडेशन ऍण्ड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात. संस्थेने कर्जत-जामखेड तालुक्‍यातील निवडक गावांमध्ये आरोग्य सर्वेक्षण करून कृती आराखडा तयार केला आहे. या सर्वेक्षणानुसार तालुक्‍यातील माता व बालक यांच्या मृत्युची कारणे शोधून त्यांना मिळत असलेल्या तुटपुंज्या सुविधांच्या पार्श्वभूमीवर मार्ग काढण्यासाठी संस्थेच्या वतीने ठिक-ठिकाणी आरोग्य शिबीरं घेतली, तसेच अतिजोखमीच्या गावात संस्थेमार्फत आरोग्यसेविका नियुक्‍त करून त्यांना प्रशिक्षण देऊन आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन केले. विविध शिबीरे, मोफत आरोग्य व्यवस्था, आरोग्य विषयांवरील मार्गदर्शन यामधून विद्यार्थी हे त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमांचे प्रात्यक्षिकांसह आरोग्य जनजागृतीचे देखील कार्य करीत आहेत. जामखेड-कर्जत भागातील शैक्षणिक आरोग्य, युवा सशक्तीकरण व रोजगार निर्मितीच्या कार्यात रत्नदीप मेडीकल फाऊंडेशन ऍण्ड रिसर्च सेंटरचा मोलाचा सहभाग आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. सर्व नागरिकांना ही दीपावली आरोग्यदायी व यशदायी जावो याच दीपावलीच्या शुभेच्छा…!!!
संपर्क:-
डॉ. भास्करराव मोरे पाटील
रत्नदीप हॉस्पिटल नगर रोड जामखेड
तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर.
फोन 9423461010 /9323465555

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)