निमसाखर- कळंब येथील विश्‍वासराव रणसिंग महाविद्यालयामधील दोन विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरी कुस्ती स्पर्धेत सुर्वणपदकाला गवसणी घातल्याने त्यांची सावित्र बाई फुले पुणे विद्यापीठ आंतर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दरम्यान, कुस्ती स्पर्धेत विद्यालयास सर्वसाधरण उपविजेतेपदही मिळाले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या पुणे जिल्हा विभागीय आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा अमृतेश्‍वर महाविद्यालय विंझर (ता. वेल्हे) या ठिकाणी पार पडल्या. यात अनिल कोंडीबा कचरेने फ्री स्टाईल 61 किलो वजनी गटामध्ये तर 97 किलो गटात दत्तात्रय धनसिंग खामगळने सुवर्णपदक पटकवले आहे. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुहास भैरट यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान, इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान व विश्वासराव रणसिंग महाविद्यालय यांच्यावतीने या खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रतिनिधी विरसिह रणसिंग, पै. संदीप पाटील, शहाजी कवळे, प्राचार्य अंकुश आहेर आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. विजय केसकर तर प्रा. प्रशांत शिंदे यांनी आभार मानले. संस्थेच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग, सचिव अण्णासाहेब हेगडे तसेच सर्व विश्‍वस्तांनी विजयी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)