रणवीर सिंह पहिल्या त्रिभाषी चित्रपटासाठी सज्ज

बॉलीवूडमधील सुपरस्टार रणवीर सिंह याचा आगामी “83′ हा चित्रपट तीन वेगवेगळया भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत रिलीज होणार आहे. रणवीर सिंह आणि दिग्दर्शक कबीर खान यांचा “83′ हा पहिला त्रिभाषी चित्रपट ठरणार आहे.

या चित्रपटात रणवीर सिंह हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारण्यासाठी मोठी मेहनत घेत आहे. या बहुप्रतीक्षित क्रीडा चित्रपटात भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण घटनांपैकी एक अभूतपूर्व क्षण प्रेक्षकांसमोर सादर करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

1983मध्ये झालेल्या विश्‍वचषक स्पर्धेत भारतीय संघाने केलेली ऐतिहासिक कारगिरी ही प्रत्येक भारतीयांसाठी एक अभिनास्पद बाब आहे. भारतीय संघाने केलेली ही कामगिरी चित्रपटातून एकाचवेळी तमिळ आणि तेलुगु भाषेत शूट करण्यात येत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 10 एप्रिल 2020 रोजी गुड फ्राइडेदरम्यान प्रदर्शित करण्यात येणार आहे.
दरम्यान, इंग्लंडमध्ये झालेल्या या विश्‍वचषक स्पर्धेत कपिल देवने भारतीय संघाचे नेतृत्त्व केले होते. या स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच विश्‍वचषक जिंकण्याची कर्तबगारी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)