रणवीर सिंह आणि करीना पहिल्यांदाच एकत्र

रणवीर सिंहने “सिंबा’च्या निमित्ताने रोहित शेट्टी आणि करण जोहरच्या निर्मितीच्या सिनेमात काम केले. आता तो पुन्हा याच प्रॉडक्‍शनच्या आणखी एका सिनेमात काम करणार आहे. त्याच्यात एक नव्हे तर दोन हिरो असणार आहेत. करणला या सिनेमामध्ये रणबीर कपूर आणि रणवीर सिंह या दोघांना बरोबर घ्यायचे होते. हे दोघेजण पडद्यावर भाऊ भाऊ दाखवण्याचा त्याचा इरादा होता.

रणबीरने पहिल्यांदा होकार तर दिला होता, मात्र नंतर त्याने आपला विचार बदलला. रणबीरने या सिनेमाला नकार का दिला, हे करण जोहरला समजू शकलेले नाही. रोल थोडा निगेटिव्ह आहे म्हणून किंवा रणवीर सिंह बरोबरची स्पर्धा नको, म्हणून त्याने नकार दिला असावा, असा अंदाज आहे. या सिनेमासाठी करण जोहरने करीना कपूर आणि आलिया भट या दोघींनाही साईन केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

करीना आणि रणवीर पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. आतापर्यंत हे दोघेही कोणत्याही सिनेमामध्ये एकत्र आलेले नाहीत. त्यामुळे ही जोडी बघायला प्रेक्षकांनाही आवडेल. पण या सिनेमात रणवीरच्या बरोबर दुसरा हिरो कोण असेल, हे अद्याप निश्‍चित झालेले नाही. सिनेमात रणवीर सिंह हा मोठा भाऊ असल्याने त्याच्या धाकट्या भावाच्या रोलसाठी निर्मात्यांकडून दुसऱ्या ऍक्‍टरचा शोध सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)