रणवीर सिंहसोबत “सिंबा’मध्ये झळकणार अनिल कपूर

बॉलीवुडमधील मनमौजी अभिनेता रणवीर सिंह सध्या रोहित शेट्‌टी याच्या दिग्दर्शित “सिंबा’ या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात आता रणवीरसोबत अनिल कपूरही झळकणार आहे. यात अनिल कपूर पाहुणा कलाकार आहे. मात्र, त्याची भूमिका महत्त्वपूर्ण अशी असणार आहे. तसेच “सिंबा’मध्ये बाजीराव सिंघम अर्थात अजय देवगन सुद्धा “सिंघम’च्या लुकमध्ये दिसणार आहे.

रणवीर आणि दिग्दर्शक रोहित शेट्‌टीसाठी हा चित्रपट खूपच खास आहे. रणवीरने अनेक वेळा सांगितले आहे की, रोहित शेट्‌टीसोबत कमर्शल चित्रपटात काम करण्यासाठीच मी अभिनय करत आहे. तर रोहित म्हणतो की, रणवीरसह काम करताना एक वेगळयाच प्रकारची उर्जा मिळते. जी प्रेक्षकांना या चित्रपटातूनही दिसणार आहे.

दरम्यान, “सिंबा’मध्ये रणवीरसह सारा खान मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटानंतर रणवीर हा क्रिकेटवर आधारित दिग्दर्शक कबीर खान यांच्या “83′ आणि करण जोहरच्या “तख्त’चे शूटिंग करणार आहे. “तख्त’मध्ये आलिया भट्‌ट, करीना, अनिल कपूर, जान्हवी कपूर, विक्‍की कौशल आणि भूमि पेडणेकर यांच्यासोबत काम करणार आहे. तत्पूर्वी, जोया अख्तरसोबतचा “गल्ली बॉय’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)