रणवीर सिंग, आलिया भट्ट यांचा ‘गली बॉय’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

रणवीर सिंग, आलिया भट्ट यांचा ‘गली बॉय’ हा चित्रपट येत्या ‘व्हॅलेंटाइन डे’ला म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार असून, येत्या ९ जानेवारीला या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. हि कथा एका झोपडपट्टी मध्ये लहानचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नासाठी धडपडणाऱ्या २६ वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज ची तारीख प्रदर्शित करण्यासाठी व्हिडीओ तयार करण्यात आला असून, या व्हिडीओमध्ये रणवीर सिंग एक रॅप साँग गाताना दिसत आहे. ‘गली बॉय’ या चित्रपटाचं बरचंस चित्रिकरण हे धारावीमध्ये करण्यात आलं आहे. या व्हिडीओमध्येही हे स्पष्टपणे दिसून येतं.
सिनेमामध्ये रणवीर सिंग, आलिया भट, कल्की कोचलिन, अमृता सुभाष असे मराठी आणि हिंदी कलाकार आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. ट्विटवर सुध्या सकाळपासूनच #GullyBoy आणि #AsliHipHop हे दोन हॅशटॅग मोठया प्रमाणात ट्रेण्ड होताना दिसत आहे. रणवीर सिंग, अभिषेक बच्चन, अर्जून कपूर, आलिया भट, करण जोहर, अशा अनेक कलाकारांनी ‘गली बॉय’ चा व्हिडीओ शेअर केला आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)