रणवीर दीपिकाशी कधीच लग्न करणार नाही: कमाल खान

बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोड्यांमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण या जोडीचेही नाव सध्या बरेच चर्चेत असते. पडद्यावर आणि पडद्यामागेही या जोडीची केमिस्ट्री पाहायला मिळते. “राम लीला’, “बाजीराव मस्तानी’ या हिट चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर ही जोडी आता आगामी “पद्मावती’ चित्रपटात दिसणार आहे.

तत्पूर्वी, गेल्या काही दिवसांपासून रणवीर-दीपिकाचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, सोशल मीडियावर दोघांचेही एकत्र फोटो आल्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम लागला. परंतु बॉलिवूडच्या कमाल खानने या दोघांचे कधीच लग्न होणार नसल्याची भविष्यवाणी वर्तवली आहे.

वाचाळ वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कमाल आर खानने केलेल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, “सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांचे कधीच लग्न होणार नाही असे मी म्हणालो होतो. ते खरं झाले. आज मी सांगतो की काहीही झाले तरी रणवीर आणि दीपिकाचे लग्न होणार नाही. हे दोघे काही प्रेमी नाहीत. ते केवळ मित्रमैत्रीण आहेत’, असेही त्याने म्हटले आहे. कमाल खानला हे फुकटचे उद्योग सांगितले कोणी ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)