रणवीर आणि दीपिकाचे लगेच हनीमून नाही 

इटलीमध्ये रणवीर आणि दीपिका कोंकणी पद्धतीने विवाहबद्ध झाले आहेत. आज सिंधी पद्धतीने त्यांचा विवाह होत आहे. या विवाह समारंभानंतर हे दोघे लगेच हनीमूनला जाण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत होती. मात्र हे दोघे मात्र लगेच हनीमूनला जाणार नाहीत. एक छोटासा हनीमून प्लॅन केल्यानंतर ते आपापल्या कामावर परतणार आहेत. त्यानंतर रनवी सिंह जोया अख्तरच्या “गली बॉय’ आणि रोहित शेट्टीच्या “सिंबा’मध्ये काम करणार आहे. तर दीपिका मेघना गुलजारच्या दिग्दर्शनाखाली ऍसिड हल्ल्यातील पीडीत लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावरील सिनेमा करनार आहे.

या दोघांच्या लग्नाला मिडीयाला निमंत्रण नव्हते. लग्नाचे फोटो कोणीही सोशल मिडीयावर शेअर करायचे नाहीत, असे आलेल्या पाहुण्यांनाही सांगितले गेले होते. त्यामुळे यांच्या विवाह समारंभाचे कोणतेच फोटो उपलब्ध झालेले नाहीत. मात्र एक व्हिडीओ मात्र व्हायरल झाला आहे. दीपिकाने लग्नाच्यावेळी लाल साडी आणि रणवीरने भरजरी शेरवानी परीधान केली होती. या लग्नाच्या दुर्मिळ फोटोंचा लिलाव केला जाणार आहे आणि लिलावातून मिळणारे पैसे “दी लिव्ह लव्ह लाफ’ नावाच्या एका संस्थेला देणगी म्हणून दिले जाणार आहेत. ही संस्था मानसिक तणाव असलेल्या रुग्णांवर उपचार करते. या संस्थेची स्थापना स्वतः दीपिकाने केली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)