रणबीर कपूर आणि माहिरा खान एकत्र ?

अलीकडेच रणबीर कपूर आणि पाकिस्तानी ऍक्‍ट्रेस माहिरा खान यांना दुबईत एकत्र बघितले गेले होते. ग्लोबल टीचर प्राईसच्या समारंभामध्ये माहिरा खान आली होती. तेथे या दोघांच्या गप्पागोष्टी खूपच रंगल्या होत्या. प्राईस सेरेमनीच्या बॅकस्टेजलाही दोघे एकत्र होते. त्यांनी मीडियासमोर फोटो सेशनही केले. त्यांचे एकत्र हास्यविनोदाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल व्हायला वेळ लागला नाही. स्वाभाविकच गॉसिपवाल्यांच्या कामाला वेग आला. हे दोघे “डेटिंग’ करण्याच्या विचारात आहेत की काय. आता रणबीरला नवीन गर्लफ्रेंड मिळाली की काय, माहिराला पुन्हा बॉलीवूडमध्ये आणण्याचा प्रयत्न आहे का वगैरे वगैरे कल्पनांना खतपाणी घालायला सुरुवात झाली. या पार्टीच्यावेळी माहिराने पत्रकारांबरोबर थोडी चर्चा केली. त्यात तिने रणबीरचे खूप कौतुक केले. बॉलीवूडच्या युवा कलाकारांमध्ये रणबीर खूपच ब्रिलीयंट आहे, असे ती म्हणाली. यापूर्वी शाहरुख खानच्या “रईस’मध्ये माहिरा खान होती. पाकिस्तानी माहिरा खानच्या सहभागामुळेच “रईस’ची नकारात्मक प्रसिद्धी खूप झाली होती. त्याच्यानंतर ती बॉलीवूडच्या वाट्याला फिरकली नाही. तर रणबीर सध्या कॅतरिनाबरोबर “जग्गा जासूस’च्या कामात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)