रणबीर-आलियाला चाहत्यांनी दिले ‘हे’ नाव !

सिनेसृष्टीत प्रत्येक जोडीला त्यांच्या चाहत्यांकडून खास नाव मिळते. म्हणजे सैफ अली खान आणि करिना कपूरला ‘सैफिना’ हे नाव मिळाले. त्यानंतर अनुष्का-विराटचे ‘विरुष्का,’ दीपिका-रणवीरचे ‘दीपवीर.’ तसंच आता बॉलिवूडमधील नव्या लव वर्ड्सचं म्हणजेच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट तरी यापासून कसे वाचतील?

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना चाहत्यांनी विशेष नाव दिले आहे. ते आहे रालिया. सोशल मीडियावर रणबीर-आलियाचे हे नाव अतिशय लोकप्रिय झाले आहे. अजूनही रणबीरसोबतच्या नात्यावर आलिया काहीही बोललेही नाही. पण रणबीर काही इशाऱ्यातून याबद्दल काही ना काही बोलत आहे.  अलिकडेच रणबीरने सांगितले की, प्रेमात असणे ही सर्वात सुंदर गोष्ट आहे. आपण आनंदी असतो. प्रेमात प्रत्येक गोष्ट छान दिसते. प्रेमात पाणी देखील गोड लागते. त्याचबरोबर त्याने एका मुलाखतीत सांगितले की, माझा विवाहसंस्थेवर विश्वास आहे. मला माझी मुलं, पत्नी हवी आहे. माझे स्वतःचे कुटुंब हवे आहे. आणि हे लवकरच होईल अशी आशा आहे. यावरुन रणबीर पुन्हा प्रेमात पडल्याचे जाणवते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)