रणबीर आणि आलियाचा ब्रेकअप होईल

रणबीर कपूर आणि अलिया भट यांच्यातील रिलेशनशीपला आता लवकरच अधिकृत नात्याचे नाव मिळण्याची शक्‍यता आहे. कपूर आणि भट फॅमिलीकडून या दोघांच्या लग्नाचा मुहुर्त काढायची तयारी सुरू झाली आहे. ऋषी कपूरनी अगोदरच आलियाला आपली बहुरानी म्हणून पसंत करून टाकले आहे. आलियाच्या 25 व्या वाढदिवसासाठी रणबीर आपल्या आईसह बल्गेरियाला गेला होता. रणबीरची बहिण रिदिमाने काही दिवसांपूर्वीच आलियाला एक ब्रेसलेट प्रेजेंट केले होते. हे दोघेही सध्या करण जोहरच्या “ब्रम्हास्त्र’मध्ये एकत्र काम करत आहेत. त्याशिवाय मुव्ही आणि डिनर डेटसाठीही एकत्र दिसले. या वाढत्या जवळीकीमुळे बहुतेकांना आनंद झाला असेल. मात्र कतरिनाला मात्र ही जवळीक खटकते आहे. रणबीर आणि कतरिनाचे पूर्वीचे निकटचे संबंध सर्वश्रुत आहेत. मग आलिया रणबीरच्या जवळ आल्याचे कॅटला कसे खपेल. याच कारणामुळे कतरिना आणि आलियामध्ये दुरावा वाढायला लागला आहे.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आलिया आणि रणबीरमध्ये ही जवळीक टिकणार नाही. त्यांच्यात लवकरच “ब्रेकअपोअ’ होईल, असे कतरिनाला वाटते आहे. एवढेच नव्हे तर हा “ब्रेकअप’ कसा होईल, हे आपल्याला माहिती असल्याचेही तिने एका जवळच्या व्यक्‍तीशी बोलताना सांगितले आहे. ही तर एक धक्कादायक बाब झाली. एकतर रणबीर आणि आलियामध्ये ब्रेकअप होण्याची शक्‍यता कतरिनाला का जाणवते आणि हा ब्रेकअप कसा होणार हे आपल्याला माहिती असल्याचेही म्हणते आहे. ही काय भानगड आहे.

रणबीरबरोबरचा ब्रेकअप कतरिनाने अगदी खिलाडूवृत्तीने स्वीकारला होता. त्याच्याबाबत काही भावनिक पोस्ट व्यतिरिक्‍त तिने कुठेही आपल्याला दुःख झाल्याचे जाणवू दिले नव्हते. ब्रेकअप झाल्यानंतरही तिने रणबीरबरोबर “जग्गा जासूस’ केला होता. खरे तर कतरिना दुसऱ्याच्या भानगडीमध्ये आडकाठी करणाऱ्यांपैकी अजिबात नाही. त्यात तिचे आणि आलियाची काही वैयक्तिकदुश्‍मनीही नाही. आलियाच्या “राजी’ला बॉक्‍स ऑफिसवर चांगला रिझल्ट मिळाल्यावर कतरिनाने आलियावर प्रचंड स्तुतिसुमने उधळली होती. तिने आलियाचे मनापासून अभिनंदनही केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)