रणबीर संदर्भातल्या वादानंतर माहिरा खान परत येते आहे

रणबीर कपूरबरोबर न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर भटकंती आणि सिगारेट ओढतानाचे फोटो व्हायरल झाल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेली माहिरा खान आता या वादातून बाहेर पडून बॉलिवूडमधील पुढच्या सिनेमामध्ये ऍक्‍टिंग करण्यास तत्पर बनली आहे. या तिच्या नवीन सिनेमाचे नाव आहे “सात दिन मोहोब्बत इन’. या सिनेमातला आपला लुक स्वतः माहिराने सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. हा लुक बघितल्यावर या सिनेमात माहिरा अगदी चुलबुली मुलीचा रोल करत असल्यासारखे वाटते.

तिने या सिनेमातल्या आपल्या पात्राचे नावही सांगितले आहे या सिनेमामध्ये माहिरा “नीली’ नावाच्या मुलीचा रोल साकारते आहे. शाहरुख खानच्या “रईस’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी माहिरा खान ही पाकिस्तानातील प्रसिद्ध ऍक्‍ट्रेस आहे. तिचा पाकिस्तानात जेवढा चाहतावर्ग आहे, त्यापेक्षाही भारतात तिच्या चाहत्यांची संख्या जास्तच असावी. “सात दिन मोहोब्बत इन’ हा सिनेमा यावर्षी ईदच्या निमित्ताने रिलीज होणार आहे.

याच सुमारास सलमान खानचा “रेस 3′ पण रिलीज होणार आहे. त्यामुळे ही शर्यत माहिरा जिंकणार की सलमान हे पाहणे औत्सुक्‍याचे असेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)