रणजी विजेपदाकडे विदर्भाची वाटचाल

संग्रहित छायाचित्र

पहिल्या डावात 233 धावांची आघाडी
इंदूर – रणजी चषकाच्या अंतिम सामन्यातील तिसऱ्या दिवशी विदर्भाने सामन्यावरील पकड मजबूत करत विजेतेपदाकडे वाटचाल केली आहे. दिल्लीने दिलेल्या 295 धावांच्या प्रत्युत्तरात विदर्भाने तिसऱ्या दिवसाअखेर 7 बाद 528 धावा करत पहिल्या डावात 233 धावांची विशाल आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दिल्लीच्या गोलंदाजांना कोणताही प्रभाव पाडता आला नाही, तर विदर्भकडून अक्षय वाडकर याने नाबाद 133 धावांची निर्णायक खेळी केली. विदर्भाने 4 बाद 206 धावांवरून पुढे खेळताना पहिल्या सत्रात दोन गडी गमाविले. वसीम जाफर (78) आणि अक्षय वाखरे (18) हे झटपट बाद झाले. त्यानंतर अक्षय वाडकर याने आदित्य सरवटे (79) यांच्या सोबत तिसऱ्या विकेटसाठी 169 धावांची भागीदारी करत संघाला 400 धावांचा टप्पा पार करून दिला.

अक्षयने 243 चेंडूत 16 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 133 धावा करत आपल्या कारकिर्दीतील प्रथम श्रेणीतील पहिले शतक पूर्ण केले. त्याने आदित्य बाद झाल्यानंतर आठव्या विकेटसाठी सिद्धेश नेरलसोबत 113 धावांची अभेद्द भागिदारी केली. यामुळे विदर्भने सामन्यावर वर्चस्व मिळविले. तिसऱ्या दिवसाअखेर अक्षय 133 आणि सिद्धेश 56 धावांवर नाबाद आहेत. दिल्लीकडून नवदीप सैनीने 3, तर आकाश सुदन याने 2 गडी बाद केले आहेत. नितीश राणा आणि कुलवंत खेजरोलिया यांना प्रत्येकी एक-एक यश मिळाले.

संक्षिप्त धावफलक
दिल्ली – पहिला डाव – 102.5 षटकांत सर्वबाद 295
विदर्भ – पहिला डाव 4 बाद 206 धावांवरून पुढे (वसिम जाफर पायचित गो. सैनी 78, अक्षय वाखरे झे. पंत गो. सैनी 18, अक्षय वाडकर नाबाद 133, आदित्य सरवटे झे. पंत गो. राणा 79, सिद्धेश नेरल नाबाद 56. गोलंदाजी आकाश सुदान 102-2, नलिन सैनी 126-3, नितिश राणा 32-1, कुलवंत खेजरोलिया 122-1)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)