रडत बसू नका, हसत हसत जीवन जगा- वसंत हंकारे

लोणी काळभोर- जगात प्रत्येकाच्या आयुष्यात कमी जास्त प्रमाणात दुःख असून त्यासाठी रडत न बसता हसत हसत जीवन जगण्याची गरज आहे, असे मत प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी व्यक्‍त केले. आळंदी म्हातोबा (ता. हवेली) येथील श्री म्हातोबा माध्यमिक विद्यालयाचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्त प्रसिध्द व्याख्यानकर्ते वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आयुष्य रडत रडत न जगता कशापद्धतीने हसत हसत आनंदाने जगावं या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. 1993 ते 2018 या दरम्यानच्या सर्व माजी विर्द्यार्थ्यांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गेल्या 25 वर्षांत शाळेतून घडून गेलेले विद्यार्थी या ठिकाणी जमले होते. यामध्ये अनेक शेतकरी, डॉक्‍टर, शिक्षक, इंजिनियर, राजकीय व व्यावसायिक क्षेत्रात आपले नाव कमावलेले विद्यार्थी उपस्थित होते. 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा आपण ज्या शाळेत शिकलो, ज्या बाकावर बसलो त्या वर्गामध्ये बसण्याचा व जुन्या वर्ग मित्रांना भेटण्याचा आनंद सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. 2004 मध्ये 10 वी होऊन बाहेर पडलेल्या बॅचने शाळेतील विद्यार्थ्यासाठी 250 लिटर क्षमता असलेला पाण्याचा फिल्टर भेट म्हणून दिला. 25 वर्षांतील प्रत्येक बॅचने शाळेस मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. शाळेतील सर्व माजी शिक्षक एकत्र आले होते. 25 वर्षांनंतर विद्यार्थ्याना पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला.
याप्रसंगी संस्थेचे चीफ ट्रस्टी मारुती हरपळे, कार्यकारी अध्यक्ष दादा कामठे, राजेंद्र शहा, मुख्याध्यापक देशमुख सर, चौधरी सर, नामदास सर, नळे सर, मेमाने सर, नातू सर,बाजारे सर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)