रडत बसण्यात अर्थ नाही- शकिब 

नवी दिल्ली : दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर षटकार लगावून बांगला देशचे विजेतेपदाचे स्वप्न उद्‌ध्वस्त केले. मात्र या पराभवामुळे रडत बसण्यात अर्थ नसल्याचे मत बांगला देशचा कर्णधार शकिब अल हसन याने व्यक्‍त केले आहे. अशा पराभवानंतरही मनावर संयम कसा राखता आला, असे विचारता तो म्हणाला की, मी स्वतवर कसे नियंत्रण मिळविले हे मला खरोखरीच माहीत नाही. अशा क्षणी भावना अनावर होतात हे खरे. मात्र तुम्ही जर कालचक्र उलटे फिरवू शकत नसाल, तर जे घडले त्यापेक्षा भविष्यात काय चांगले करता येईल याचा विचार करणेच योग्य ठरते. आतापर्यंतच्या पाच अंतिम सामन्यांपैकी हा सर्वाधिक चुरशीचा होता.
19व्या षटकांत 22 धावा देणाऱ्या रुबेल हुसेनला पुन्हा तशाच परिस्थितीत गोलंदाजी देण्यास आपण कचरणार नाही, असे सांगून शकिब म्हणाला की, रुबेलने आमच्या नियोजनानुसारच मारा केला होता. परंतु कार्तिकची कामगिरी अकल्पनीय होती. इतक्‍या मोक्‍याच्या वेळी पहिल्याच चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार व तिसऱ्या चेंडूवर षटकार लगावणारे फलंदाज मला तरी माहीत नाहीत. कार्तिकची फटकेबाजी ऐतिहासिकच होती. किंबहुना तो एक चमत्कार होता. मी रुबेलला दोष देणार नाही. कालच्या पराभवातूनही आम्ही खूप काही शिकलो आहे आणि म्हणूनच भविष्यात लवकरच आम्हीही विजेतेपद मिळवू शकू असा विश्‍वास मला वाटतो.
मी नेहमी फलंदाजाच्या मनातील विचार वाचण्याचा प्रयत्न करतो 
मी नेहमी फलंदाजाच्या मनातील विचार वाचण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला ते जड गेले. परंतु एकदा तसे करणे जमू लागल्यावर पॉवर-प्लेमधील गोलंदाजीचे आव्हान सोपे वाटू लागले. कालच्या अंतिम सामन्यात दिनेशभाईने ज्या प्रकारे भारताला विजय मिळवून दिला, ते मी कधीच विसरणार नाही. मी त्यावेळी तेथे होतो, हे माझे भाग्यच म्हणावे लागेल. – वॉशिंग्टन सुंदर (मालिकावीर) 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)