रजोनिवृत्ती आणि हृदयविकार (भाग १)

डॉ. मेधा क्षीरसागर 

भावनिक अस्थैर्य हे रजोनिवृत्तीचे आणखी एक महत्त्वाचे लक्षण आहे. बऱ्याच वेळा स्त्रीला स्वत:लाच हा भावनांचा हिंदोळा कळत नाही. एका क्षणी ती पूर्णपणे स्थिरचित्त असते, प्रसन्न असते तर पुढच्या काही क्षणात ती अचानक चिडते काय, रडते काय, रागावते काय? हे सगळे भावनिक बदल इतरांनाही कळत नाहीत. तिच्या अशा बदलत्या मूडमुळे नातेवाईक तिला टाळायला लागतात. काही महत्त्वाच्या गोष्टी सांगेनासे होतात. कारण ती कसा काय प्रतिसाद देईल याची त्यांना खात्री नसते. मग तिला घरातले सगळे बेइमान वाटतात. आपली प्रतारणा करत आहेत असे वाटते. या काळात स्त्रियांना रात्री नीट झोप येत नाही. इतर अनेक लक्षणांमुळे तिची झोप बिघडते. पण रजोनिवृत्तीच्या प्रत्यक्ष परिणामामुळेसुद्धा झोप येत नाही. ती सतत उसासे देत कुशीवर वळत असते.

स्त्रीला रात्र म्हणजे एक भयंकर शिक्षाच वाटते. कित्येक रात्री शांत झोप लागली नाही म्हणून पूर्ण दिवसभर अस्वस्थ वाटते. रक्‍तदाब वाढला आहे, मधुमेहावरचा ताबा राहत नाही. झोप न आल्यामुळे दिवसा कामात किंवा कशातही मन रमत नाही. मन एकाग्र होत नाही. नोकरीवर असल्यास नेहमीच्या कामात चुका होतात. घरातसुद्धा साध्या साध्या गोष्टी जमत नाहीत. स्वयंपाक हमखास बिघडतो. खरे तर काही स्त्रियांना रजोनिवृत्ती सुरू व्हायच्या एक-दोन वर्षे आधीच हार्मोन्सचे असंतुलन झाल्यामुळे झोप न येण्याची तक्रार सुरू होते. याच काळात बऱ्याच स्त्रियांना झोपेच्या गोळ्या घ्यायचे व्यसनही जडते. म्हणून झोपेचे नियोजन करणे आवश्‍यक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हिला हृदयाच्या आरोग्याकडे फार लक्ष देत नाहीत. तर रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये या आजारांची लक्षणे अधिक प्रमाणात दिसू लागतात. सामान्यत: पुरुषांना हृदयविषयक आजारांचा अधिक धोका असल्याचे मानले जाते, पण जागतिक स्तरावर दावा करण्यात आला आहे की, पुरुषांपेक्षा महिला या आजाराने पीडित आहेत.

रजोनिवृत्तीनंतर निश्‍चितच हृदयविषयक आजार होणार असे नाही. पण रजोनिवृत्तीच्या वेळी उच्च मेदयुक्‍त आहार, वयाच्या सुरुवातीच्या काळापासूनच धूम्रपान करण्याची सवय इत्यादींसारखे धोकादायक घटक निश्‍चितच हृदयविषयक आरोग्यावर परिणाम करू शकतात. रजोनिवृत्तीदरम्यान शरीरात हार्मोनल बदल होतो. त्यामुळे महिलांमधील हृदयविषयक आजारांच्या वाढत्या धोक्‍यासाठी कारणीभूत असलेल्या धोकादायक बाबींची माहिती पुढील प्रमाणे –

स्त्रीच्या आयुष्यात शारीरिक विकासाचे जे टप्पे आहेत त्यात रजोनिवृत्ती हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात स्त्रियांमध्ये शारीरिक बदलांबरोबर मानसिक बदलही घडत असतात. चाळिशी-पन्नाशीच्या दरम्यानचा काळ रजोनिवृत्तीचा कालावधी असतो. नेमके याच दरम्यान तिच्या आयुष्यात काही मनाविरुद्ध व काही दुर्दैवी घटनाही घडतात. मुले आपापला संसार थाटून वेगळे नांदायला जातात. कधी आयुष्याचा जोडीदार अचानक जग सोडून जातो. कधी आयुष्यभर आधार देणाऱ्या माता-पित्याचे निधन होते. अनपेक्षित आजार विशेषत: मधुमेह व रक्‍तदाबासारखे जीवनशैलीविषयक आजार तिला याच काळात त्रास देत असतात.

नोकरदार स्त्रीची सेवानिवृत्तीही याच दरम्यान होते. यामुळे जीवनाची जी एक व्यस्त व मस्त अशी घडी असते ती विस्कळीत व्हायचाही हाच काळ असतो. यामुळे स्त्रीला आपल्या वैयक्तिक जीवनात खूप मोठा मोकळा वेळ निर्माण झाल्यासारखे वाटते. आपला आयुष्यावरचा ताबा हातातून गेला आहे म्हणून येणारी विमनस्कता आणि स्वत:बद्दलचा कमी होणारा विश्‍वास व महत्त्व यामुळे मानसिक खच्चीकरणही या काळात होते. विशेषत: ज्या भगिनींनी नुसती गृहिणी म्हणून भूमिका बजावलेली असते, त्यांना रजोनिवृत्तीमुळे येणाऱ्या बदलांना सक्षमपणे सामोरे जाता येत नाही. त्याचा मानसिक दुष्परिणामही त्यांना सहन करावा लागतो. याउलट ज्या स्त्रियांनी उत्तमपणे नोकरी केली आहे, करिअरमध्ये समाधान मिळविले आहे, हाताशी पैसा आहे तो स्वत:साठी कुणावर अवलंबून न राहता वापरता येतो, त्या स्त्रिया रजोनिवृत्तीतील बदलांना शांतपणे सामोरे जातात.

बऱ्याच गृहिणींचा वाढता चिडचिडेपणा घरातील नातेवाईक विशेषत: नवरा समजून घेईलच असे नाही. त्यामुळे आता तुझे वय झाले आहे म्हणून उगाचच राग राग करतेस. सायकिक झाली आहेस, उगाचच चिडचिडी झाली आहेस अशा टोमण्यांनी तिला आणखी सतावले जाते. रजोनिवृत्तीचा काळ स्त्रियांमध्ये साधारणपणे वयाच्या 45 नंतर चालू होतो. काही स्त्रियांच्या बाबतीत तो खूप लवकर व खूप नंतरही येतो. रजोनिवृत्ती ही खरे तर नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण बऱ्याच वेळा गर्भाशय व अंडाशय काही महत्त्वाच्या वैद्यकीय कारणांमुळे जसे की, कर्करोग झाला तर शस्त्रक्रियेमुळे काढला गेल्यास रजोनिवृत्ती कृत्रिमरीत्या येते. रजोनिवृत्तीचा त्रास मासिक पाळी बंद झाल्यावर दोन ते चार वर्षांत आपसूक संपतो. पाळी गेल्यानंतरच्या काळात शरीरातील इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन ही हार्मोन्स कमी होऊ लागतात. स्त्रीची मासिक पाळी थांबते आणि नैसर्गिकरीत्या तिला आता गर्भधारणा होत नाही.

इस्ट्रोजन पातळी महत्त्वाची भूमिका बजावते :                                                                                महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर हृदयविषयक आरोग्य कमी होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे नैसर्गिक हार्मोन इस्ट्रोजन कमकुवत होणे. इस्ट्रोजन धमन्यांच्या आतील भागावर सकारात्मक परिणाम करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. हे हार्मोन्स महिलांमधील हृदयाघाताचा धोका लक्षणीयरीत्या कमी करतात. पण हृदयविषयक आरोग्य कमकुवत होण्याला कारणीभूत असलेल्या इतर विविध घटकांबाबत विविध टप्प्यांवर संशोधन केले जात आहे.

हृदयविषयक आजार होण्याचा इतिहास : 
आरोग्यदायी जीवनशैली असण्याबाबत हौशी असल्यास हीच सवय रजोनिवृत्तीनंतरदेखील कायम राहते. ज्यामुळे हृदयविषयक आजार किंवा हृदयाघाताचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. कुटुंबामध्ये हृदयविषयक आजार होण्याचा आनुवांशिक दोष असल्यास व्यक्तीला हा आजार होण्याचा सर्वाधिक धोका असतो. या आजाराचा वाढता धोका पाहता लोकांनी त्यांच्या हृदयविषयक आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि सावधगिरी बाळगली पाहिजे.

रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजनपासून मिळणारे संरक्षण कमी होत असल्यामुळे हृदयविषयक आजार होण्याचा धोका वाढतो. महिलांमध्ये वयाच्या 50 व्या वर्षी होत असलेल्या 50 टक्‍क्‍यांहून अधिक मृत्यूंच्या प्रमाणासाठी हृदयविषयक आजार कारणीभूत ठरत आहे. हृदयक्रिया कमकुवत होणे आणि जीवनाचा दर्जा खालावून जाणे, अशा काही परिस्थितींचा सामना करावा लागतो. सामान्यत: वारंवार धूम्रपान करणाऱ्या, डायबेटिक, उच्च रक्‍तदाब असलेल्या किंवा या आजारांबाबत कौटुंबिक इतिहास असलेल्या, तसेच उच्च प्रमाणात कोलेस्ट्रॉल असलेल्या महिलांना रजोनिवृत्तीनंतर हृदयविषयक आजार होण्याचा उच्च धोका आहे. इस्ट्रोजनच्या पातळ्यांमध्ये घट झाल्यामुळे हृदयाव्यतिरिक्त हाडांवर देखील परिणाम होतो. हाडे बारीक होऊन जातात त्यामुळे हाडांमध्ये फ्रॅक्‍चर्स येऊ शकतात. हृदयाघात, रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठणे, हाडे कमकुवत व बारीक होणे, हे महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर हृदयविषयक आजार होण्यास कारणीभूत घटक आहेत.

डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार वयाच्या 40 व 50 वर्षामधील महिलांनी संतुलित आहाराचे सेवन केले पाहिजे. आहारामध्ये कर्बोदके व प्रथिनांचा समावेश असावा. फळे, भाज्या, कडधान्ये, कमी चरबीयुक्त दुग्ध पदार्थ, मांस, मासे, काजू-बदाम यांचा समावेश असलेला आहार आरोग्यदायी हृदयासाठी आवश्‍यक आहे. हृदयविषयक आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवसातून किमान एक तास व्यायाम करावा. चालणे, सायकल चालवणे, नृत्य करणे, पोहणे हे हृदयविषयक आरोग्य उत्तम राखण्यामध्ये साह्य करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)