“रजिस्टार डीन झाले अन्‌ डीन रजिस्टार झाले’

पुणे विद्यापीठात रंगली चर्चा : विद्यापीठात झाल्या अंतर्गत बदल्या

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव पदावर असलेले डॉ. अरविंद शाळिग्राम यांची विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधिष्ठातापदी नियुक्‍ती झाली. तर, वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल पवार यांच्याकडे प्रभारी कुलसचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. “रजिस्टार डीन झाले अन्‌ डीन रजिस्टार झाले,’ अशीच चर्चा विद्यापीठात झालेल्या अंतर्गत बदलीवरून रंगली होती. दरम्यान, विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रगतीचा विचार करून ही अंतर्गत बदली करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तत्कालीन कुलसचिव नरेंद्र कडू यांच्या सेवानिवृत्तीनंतर पुणे विद्यापीठाचे हे पद रिक्‍त आहेत. त्यानंतर प्रभारी कुलसचिव म्हणून विद्यापीठातील इलेक्‍ट्रानिक्‍स विभागाचे प्रमुख डॉ. अरविंद शाळिग्राम यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. दरम्यानच्या काळात विद्यापीठाने कुलसचिव पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली. त्यानुसार मुलाखतीचे नियोजनही केले होते. मात्र, न्यायालयीन वादामुळे उच्च शिक्षण विभागाने पुणे विद्यापीठासह सर्वच विद्यापीठाचे कुलसचिव पदाची निवड प्रक्रिया थांबविण्यात आली. त्यामुळे सध्या कुलसचिवपद हे प्रभारीवरून सुरूच आहे.

विद्यापीठाने काल अंतर्गत बदली केली. त्यात प्रभारी कुलसचिवपदी वाणिज्य विभागप्रमुख डॉ. प्रफुल्ल पवार यांची नियुक्‍ती केली. त्यानुसार त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला. डॉ. अरविंद शाळिग्राम यांची विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या अधिष्ठाता म्हणून नामनिर्देशानाद्वारे कुलगुरूंनी नियुक्‍ती केली आहे. यापूर्वीचे अधिष्ठाता डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी अधिष्ठाताचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्‍त होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)