रजा मुदतीच्या शिक्षकांसाठी फेर अभिप्राय घेणार -आयुक्त

पुणे : शिक्षण मंडळाकडील रजा मुदतीवरील 93 शिक्षकांना कायम सेवेत घेण्यासंदर्भात नगरविकास विभागाचा पुन्हा अभिप्राय घेण्यात येईल, असे आश्‍वासन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी आज सर्वसाधारण सभेत दिले. नगरसेवक विशाल तांबे यांनी यासंदर्भातील चर्चा उपस्थित केली होती. ते म्हणाले, की शिक्षण मंडळ अस्तित्वात असताना शिक्षण मंडळामध्ये अनेकवर्ष रजा मुदतीवर काम करत असलेल्या शिक्षकांना कायम सेवेत घेण्याचा तसेच त्यांच्या वेतनाचा निर्णय घेण्यात आला होता. परंतू याची अंमबजावणी होण्यापुर्वीच शिक्षण मंडळ बरखास्त झाले आणि महापालिकेकडे कारभाराची सूत्रे आली. त्यामुळे प्रशासनाने या शिक्षकांना सेवेत घेण्यासंदर्भात नगरविकासाचा अभिप्राय घेण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. नगरविकास विभागाने यावर नकारात्मक शेरा दिला, ही आश्‍चर्याची बाब आहे. यावर स्पष्टीकरण देताना आयुक्त कुणाल कुमार यांनी वरिल आश्‍वासन दिले. ते म्हणाले, की शिक्षण मंडळाचा आकृतीबंध राज्य शासनाकडे प्रलंबीत आहे. तो लवकरच मंजुर होईल, अशी अपेक्षा आहे. तो मंजूर झाला की रजामुदतीतील शिक्षकांनाही सेवेत घेण्यासंदर्भात नगरविकास विभागाकडे सुधारीत प्रस्ताव पाठवून अभिप्राय घेण्यात येईल असे आयुक्तांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)