रजनीकांत यांना माध्यमांनी मोठे केले – सुब्रमण्यम स्वामी

चेन्नई : दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकीय इनिंगची सुरुवात केली आहे. राजकारणात प्रवेश करत असून स्वतःचा पक्ष स्थापन करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केल्यामुळे प्रस्थापितांना मोठा हादरा बसला आहे. रजनीकांत यांच्या नव्या इनिंगच्याच चर्चांनी जोर धरला. पण, या सर्व वातावरणात भाजपाच्या सुब्रमण्यम स्वामी यांनी रजनीकांत यांना माध्यमांनी मोठे केलं असल्याचं वक्तव्य करत रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशावर टीका केली.

रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाविषयी एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सुब्रमण्यम स्वामी यांनी आपले मत मांडले. ‘त्यांनी फक्त राजकीय प्रवेशाची घोषणा केली आहे. त्याविषयी कोणतीच विस्तारित माहिती किंवा कागदपत्र सादर केले नाहीत. ते अशिक्षित आहेत. किंबहुना माध्यमांनी उगाचच हवा देऊन त्यांना मोठे केले आहे’, असे ते म्हणाले. तामिळनाडूची जनता चाणाक्ष असून, त्यांना हे सर्व लक्षात येईलच असेही त्यांनी स्पष्ट केले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)