रजनीकांत यांच्या वक्तव्याला अद्रमुकचा आक्षेप 

कोण प्रबळ कोण दुबळा ते जनतेला ठरवू द्या 

चेन्नाई: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रबळ असल्याचे विधान दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांनी केले होते. त्याला तामिळनाडुतील सत्ताधारी अद्रमुकने जोरदार आक्षेप घेतला आहे. कोण प्रबळ आणि कोण दुर्बळ हे जनतेला ठरवू द्या, जनताच या प्रकराचा निकाल मतदानाच्या माध्यमातून देईल असे या पक्षाने रजनीकांत यांना बजावले आहे.

अद्रमुक पक्षाचे नेते व राज्यातील एक मंत्री डी जयकुमार यांनी म्हटले आहे की लोक आपला कारभार बघत असतात, निवडणुकीच्या माध्यमातून ते आपला कौलही नोंदवत असतात त्यामुळे प्रबळ-दुर्बळ या विषयी त्यांनाच निर्णय घेण्याचा अधिकार आहे. कोणी कोणाला प्रबळ म्हणाल्याने कोणी तसे होत नाही असे ते म्हणाले. पुढील वर्षी लोकसभा आणि सन 2021 मध्ये राज्यात विधानसभेच्या निवडणुका होतील त्यावेळीच जनता आमच्या बाजूनै कौल देईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे. आपणच आपल्या मुलाला चांगले म्हटले तरी तो खरेच चांगला आहे की नाही हे त्याचे शिक्षक आणि हेडमास्तर ठरवतात हे रजनीकांत यांनी लक्षात घ्यावे असेही त्यांनी त्यांना सुचवले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)