रजनीकांत यांच्या राजकारणात येण्याच्या निर्णयाचे मुंबईत जोरदार स्वागत

मुंबई – दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत यांनी आज राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्या या निर्णयाचे स्वागत देशभरातून होताना दिसत आहे. दरम्यान आज रजनीकांत यांनी नवा पक्ष काढणार असल्याची घोषणा करताच, मुंबईमध्ये रजनीच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक करत आणि फाटाके फोडत त्यांच्या फॅन्सनी या घोषणेचं धुमधडाक्यात स्वागत केलं.

आपण लवकरच स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा करणार असून तामिळनाडूच्या आगामी विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागी आपले उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा रजनीकांत यांनी आज केलीय.दरम्यान रजनीकांत राजकारणात येणार असल्याची अनेक दिवसांपासून चर्चा होती. मात्र ते नवीन पक्ष काढणार की भाजपसोबत जाणार  याबाबत अनेक तर्क -वितर्क लढवण्यात येत होते. मात्र आज  रजनीकांत यांनी नवा पक्ष काढणार असल्याची घोषणा  करत या  चर्चेला पूर्ण विराम दिला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)