रजनीकांत यांचा “काला’ जून महिन्यात होणार रिलीज

सुपरस्टार रजनीकांत यांच्या बहुचर्चित आगामी ‘काला’ या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. याआधी काही वेळा या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली गेली. त्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला होता. पण आता या सिनेमाची वाट पाहणा-या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बाब आहे. ‘काला’ सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा रजनीकांत यांचा जावई अभिनेता धनुष याने केलीये. त्याने त्याच्या ट्‌विटर अकाऊंट ही माहिती शेअर केली आहे. हा ‘काला’ सिनेमा येत्या जून महिन्यात 7 तारखेला जगभरातील सिनेमाघरांमध्ये रिलीज होणार आहे.

वेगवेगळ्या भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. याआधी हा सिनेमा 27 एप्रिलला रिलीज होणार होता. साऊथ सिने इंडस्ट्रीत सुरु असलेल्या संपामुळे हा सिनेमा ठरलेल्या वेळत रिलीज होऊ शकला नाही. या सिनेमात रजनीकांत एका गॅंगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात नाना पाटेकर, हुमा कुरेशी, अजंली पाटील हे कलाकारही असणार आहेत. याशिवाय रजनीकांत यांचा “2.0′ हा सायन्स हॉररपटही लवकरच येणार आहे. त्यामध्ये रजनीकांतबरोबर अक्षय कुमार व्हिलनच्या रोलमध्ये असणार आहे. स्पेशल इफेक्‍टचा प्रचंड गाजावाजा झालेला हा सिनेमा किमान तीन वेळा पुढे ढकलला गेला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)