रजनीकांत करणार नव्या राजकीय पक्षाची स्थापना

नवी दिल्ली- दक्षिणेतील राजकारण्यांच्या चित्रपटसृष्टीतून राजकारणात प्रवेश करण्याची परंपरा पुढे नेत सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी वर्षाच्या अखेरच्या दिवशी स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. मी राजकारणात प्रवेश करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळेच माझा राजकीय पक्ष तामिळनाडूमधील आगामी विधानसभा निवडणूक लढवेल, असे तमिळ चित्रपटसृष्टीतील अभिनेते रजनीकांत यांनी जाहीर केले आहे. रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे आगामी काळात तामिळनाडूतील राजकीय समीकरणे कमालीची बदलू शकतात.

रजनीकांत यांनी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या निर्णयावर भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी सकारात्मक विचार व्यक्त केले आहेत. तामिळनाडूतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष तमिळईसाई सौदराराजन यांनी ट्‌विट करुन रजनीकांतला राजकारणात प्रवेश केल्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आम्ही रजनीकांत यांच्या घोषणेचे स्वागत करतो. आम्ही असे म्हणतच होतो, की तामिळनाडूला आता सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अशा अनेक लोकांचा सहभाग आवश्‍यक आहे. भ्रष्टाचार थांबला पाहिजे आणि रजनीकांत ने तसे वचनही दिले आहे. हे चांगले असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

तर रजनीकांतचा तमिळनाडुच्या राजकारणात प्रभाव असेल, आणि त्यांनी विधानसभा निवडणुका स्वंतत्रपणे लढवणार असल्याचे व भाजप सोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, याबद्दल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते थियाराजन यांनी समाधान व्यक्‍त केले आहे. तामिळनाडूमध्ये कॉंग्रेसची डीएमकेसोबत युती आहे आणि ती पुढेही राहणार असल्याचे थियाराजन यांनी स्पष्ट केले.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी ाजकारणात प्रवेश करायला रजनीकांतला कोणतेही बंधन नाही. कारण हा एक लोकशाहीचा देश असल्यामुळे तो राजकारणात येऊ शकतो असे मत व्यक्त केले.यावेळी अभिनेते कमल हसन आणि अमिताभ बच्चन यांनी ही रजनीकांतच्या या निर्णयाचे स्वागत केले. कमल हसन यांनी सामाजिक भान राखून समाज सेवेसाठी राजकारणात प्रवेश करण्यासाठी रजनीकांतला ट्‌विटवरून शुभेच्छा दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)