रजनीकांतच्या “काला’ला मिळाले 20 लाख ट्‌विट

रजनीकांतच्या “काला’ या सिनेमासाठी ट्‌विटरने एक विशेष इमोजी रिलीज केले. रजनीकांत यांचा “काला’ 7 जून रोजी रिलीज होणार आहे. यानिमित्ताने “हॅशटॅग काला’ ट्‌विट करून हा खास इमोजी बघु शकतात. हा इमोजी “काला’मधील रजनीकांत यांच्या रोलवरून प्रेरणा घेऊनच तयार करण्यात आला आहे.

ट्‌विटरने रिलीज केलेल्या या खास इमोजीबाबत वंडरबार फिल्म्स प्रा.लि. चे कार्यकारी निर्माता एस. विनोद यांनी ट्‌विटरला धन्यवाद दिले आहेत. सिनेमा रिलीज होण्याला अद्याप आठवडा बाकी आहे. पण ट्‌विटरवर “काला’च्या संदर्भात 20 लाखापेक्षा अधिक ट्‌विट पोस्ट झाले आहेत. यातच या सिनेमाची पूर्वप्रसिद्धी किती यशस्वी झाली, हे समजू शकते.

रजनीकांतच्या प्रत्येक सिनेमाला त्यांच्या फॅन्सकडून असाच भरभरून प्रतिसाद मिळत असतो. रजनीकांत हे एक महान कलाकार आहेत. त्यामुळे त्यांच्या सिनेमाबाबत अशी अवर्णनीय लोकप्रियता मिळणे स्वाभाविक आहे, असे ट्‌विटर इंडियाच्या एन्टरटेनमेंट हेड पार्टनरशीप केया माधवन यांनी म्हटले आहे.

रजनीकांत आणि अक्षय कुमारच्या “2.0’बद्दलही अशीच कमालीची क्रेझ निर्माण झाली आहे. मात्र तांत्रिक कामास्तव या सिनेमाचे प्रदर्शन पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलले गेले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)