रजनीकांतचा जावई धनुष बनतोय हॉलिवूडमध्ये फकीर

रजनीकांतचा जावई धनुष आता हॉलिवूडमध्ये झळकणार आहे. ‘दि एक्‍स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ दि फकीर’ या सिनेमातून धनुष दिसणारेय. या शूटिंगच्या निमित्ताने धनुष मुंबईच्या रस्त्यांवर दिसला होता. रोमान पोर्टुलासच्या कादंबरीवर हा सिनेमा आहे. या सिनेमाचे शूटिंग मुंबई, पॅरिस, रोम, ब्रुसल्स इथे होणार आहे. या शूटिंगचे फोटोज वायरल झाले आहेत.
केन स्कॉट हा सिनेमाचे दिग्दर्शन करतो आहे. एका मुलाखतीत केनने धनुषच्या अभिनयाचे खूप कौतुक केले. तो म्हणाला, “धनुषची नाचण्याची आणि गाण्याची अशी वेगळी स्टाइल आहे. त्यामुळे तो वेगळा ठरतो.’ सिनेमाची रिलीज डेट अजून ठरायची आहे. धनुषसोबत सिनेमात एरिन मोरिआर्टी, सीमा बिस्वास आणि लॉरेन लफिट यांच्या भूमिका आहेत. यामध्ये उमा थ्रुमन ही देखील असणार आहे, असे पूर्वी समजले होते. मात्र सिनेमाच्या प्रमोशनल वेबपेजवर तिचे नाव गायब होते. दरम्यान धनुषचा ‘व्हिआयपी 2’ हा त्याच्या वाढदिवसाच्यादिवशीच म्हणजे 28 जुलै रोजी रिलीज होणार आहे. त्याच्या या “व्हिआयपी 2’मधून काजोल तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा दिसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)