रघुरामला मिळाली नेटली…

एमटीव्हीचा लोकप्रीय शो ‘रोडिज’चा माजी परिक्षक रघुराम आणि त्याची पत्नी सुगंधा यांचा नुकताच घटस्फोट झाल्याच्या बातम्या आपण ऐकल्या होत्या. त्यावेळी रघुराम चांगलाच भावूक झाल्याचे पाहायला मिळाला. पण त्याचे हे दुःख काही दिवसांतच कमी झाल्याचे दिसत आहे. त्याचे कारणही तसेच आहे, रघुला त्याचे नवीन प्रेम मिळाले असल्याचे सांगण्यात येत आहे. याची कबुली खुद्द रघूने सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिली आहे. सिंगर नेटली दि लुकसिओ असे रघूच्या नवीन प्रेमाचे नाव आहे.

२०१६ मध्ये नेटली आणि रघु ‘आंखो ही आंखो में’ या गाण्यानिमित्त एकत्र आलेत आणि पुढे एकमेकांत गुंतले. पुढे रघुने पत्नी सुगंधासोबत घटस्फोट घेतला आहे. आता रघुने नेटलीसोबतचे नाते जगजाहिर केले आहे. ‘काही वर्षाआधी आजच्याच दिवशी तू माझ्या आयुष्यात आली आणि माझा मी मला परत मिळालो. तुझ्यासोबत मी प्रेम अनुभवले, आनंद अनुभवला. तू माझ्या आयुष्यात आशा बनून आलीस. आय लव्ह यू…,’ अशी एक अतिशय भावूक पोस्ट रघुने लिहिली आहे. सोबत नेटलीसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)