रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष पुरवणीचे प्रकाशन

फलटण, दि. 14 (प्रतिनिधी) – दै. प्रभातने फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष पुरवणीचे प्रकाशन रघुनाथराजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष पुरवणीतील माहितीपूर्ण लेखांचे त्यांनी कौतूक केले.
फलटण बाजार समितीचे सभापती आणि नगरसेवक रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांचा वाढदिवस गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने दै. प्रभातच्या वतीने विशेष पुरवणी प्रकाशीत करण्यात आली होती. त्याचे प्रकाशन रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दै. प्रभातचे निवासी संपादक मुकुंद फडके, ब्युरो मॅनेजर जयंत काटे, नगरसेवक अजय माळवे तसेच टीम प्रभात उपस्थित होते. याप्रसंगी रघुनाथराजे यांनी वाढदिवस विशेष पुरवणीतील लेख दर्जेदार असून असल्याचे नमूद केले. दै. प्रभातने निर्भिडपणे सर्वसामान्यांच्या विषयांना वाचा फोडली आहे. तसेच अभ्यासपूर्ण लेख आणि वस्तुनिष्ठ बातम्यांमुळे वाचकांच्या बुद्धीला चांगले खाद्य मिळत असल्याचे रघुनाथराजे म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)