रखडलेल्या प्रकल्पांच्या पूर्ततेची तयारी

संग्रहित छायाचित्र...

आम्रपाली ग्रुपकडे फ्लॅटसाठी नोंदणी करणारे अनेक खरेदीदार अनेक वर्षांनंतरही घर मिळण्याची वाट पाहात आहेत. कंपनीच्या रखडलेल्या प्रकल्पांच्या पूर्ततेची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने एनबीसीसी ग्रुपकडे सोपविली आहे. त्यासाठी एनबीसीसीने एक योजना तयार केली असून, ती मंजूर झाल्यास सर्व रखडलेले प्रकल्प लवकर मार्गी लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. ही योजना एनबीसीसीने सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे. रखडलेल्या प्रकल्पात फ्लॅट बुक करणाऱ्या खरेदीदारांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणीही सुरू आहे.

निधी जमविण्यासाठी एनबीसीसीने एक पर्याय दिला असून, त्यानुसार ज्या फ्लॅटची विक्री अद्याप झालेली नाही, ते विकण्याची परवानगी मागितली आहे. रिकाम्या असलेल्या 4885 फ्लॅटच्या विक्रीतून 27 अब्ज रुपयांचा निधी उभा राहू शकतो, असा एनबीसीसीचा अंदाज आहे. याखेरीज जुन्या घरांच्या खरेदीदारांकडून सुमारे 40 अब्ज रुपयांची थकबाकी अजून जमा व्हायची आहे. ती वसूल करण्याबरोबरच अन्य काही मार्गांनी पैसा उभा करण्याची एनबीसीसीची ही योजना आहे. एफएसआयचा पुरेपूर वापर करूनही अधिक रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. एनबीसीसीने 46 हजार 575 फ्लॅटचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी 85 अब्ज रुपयांची गरज असल्याचे म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

– जान्हवी शिरोडकर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)