रक्‍तदाब नियंत्रित करण्यासाठी घरगुती उपाय

डॉ. त्रिशला चोप्रा 
आपण स्वत:ला असा प्रश्‍न विचारणे आवश्‍यक आहे की, उच्च वा कमी रक्तदाब हा इतका मोठा विषय का आहे? डॉक्‍टरांच्या भेटीसाठी जाताना प्रत्येक वेळी आपले डॉक्‍टर आपल्या रक्तदाबाचे निरीक्षण का करतात? 120/80 एका निरोगी व्यक्तीसाठी सामान्य बीपी (रक्तदाब) मानले जाते. बीपी ही, आपल्या शरीरातील रक्त आपल्या रक्तातील भिंतींवर किती वेगाने आणि ताकदीने आघात करते हे मोजण्याची संज्ञा आहे.
हृदयामधील धमन्यांमध्ये (रक्तवाहिन्या) रक्त वाहते आणि ह्या वाहिन्या संपूर्ण शरीरात रक्त पुरवण्याचे काम करतात. उच्च बीपी ज्याला उच्च रक्तदाब असे देखील म्हणतात ही एक अशी धोकादायक स्थिती आहे ज्यामुळे शरीरात रक्त पंप करणाऱ्या हृदयाला रक्त पुरवठा करण्यास अधिक परिश्रम करावे लागतात आणि त्यामुळे धमन्या किंवा एथ्रोसलेरोसिस कडक होणे आणि हृदयरोग होण्यासारखे गंभीर आजार उद्‌भवतात. सामान्यतः उच्च बी.पी. कोणतीही पूर्व लक्षणं न सांगता होतो त्यामुळे त्याला गुपचूप शरीराचा ऱ्हास करणारा रोग म्हणतात, हे असे म्हटले जाते कारण हृदयांचे आणि स्ट्रोकसारख्या एक किंवा अधिक संभाव्य घातक गुंतागुंत असणाऱ्या रोगांना यांमुळे आमंत्रण दिले जाते.
उच्च बीपी होण्याची प्रमुख कारणे 
उच्च बीपीचे योग्य कारणे ज्ञात नाहीत; परंतु उच्च रक्तदाब होऊ शकणारे अनेक घटक आणि शर्ती आहेत:
 धुम्रपान, लठ्ठपणा, आळशी जीवनशैली, आहारातील जास्त प्रमाणात मिठाचे सेवन, जास्त प्रमाणात दारू, वय, उच्च रक्तदाबाचा कौटुंबिक इतिहास,  तीव्र मूत्रपिंड रोग किंवा सीकेडी, अधिवृक्क आणि थायरॉईड विकार.
कमी बीपी होण्याची प्रमुख कारणं 
कमी बीपीचे कोणतेही लक्षणीय कारण सांगता येत नाही परंतु त्यामुळे हायपोटेन्शन होऊ शकते.
निर्जलीकरण, तीव्र रक्तस्राव, अवयावस सूज, अति घाम येणे, अशक्त हृदय, ब्राडीकार्डिया (मंद गतीचा दर)
उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी घरगुती उपाय:
सकाळी काही कच्चे बदाम खा. ते आपल्या परिचलनासाठी चांगले आहेत आणि त्यांच्या सेवनाने उच्च एलडीएल कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाब खाली येतो.
दुधामधून चिमूटभर हळद पावडर घ्यावी. हळद नैसर्गिकरीत्या रक्त पातळ करते आणि आपले रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करते.
1-2 कच्च्या लसूण पाकळ्या ठेचून दररोज रिकाम्या पोटी खा. अथवा, आपण 5-6 पाकळ्यांचा लसूण रस 4 टिस्पून पाण्यात मिसळू शकता आणि दिवसातून दोन वेळा ते पिऊ शकता.
अर्ध्या लिंबाचा रस कोमट पाण्यात घालून प्या. उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी सकाळी रिक्त पोटी घेतल्यास फायदा होतो.
एका काचेच्या कंटेनरमध्ये 10 ग्रॅम त्रिफळा पावडर रात्रभर भिजवा. सकाळी, हे मिश्रण गाळून घ्या. या पाण्यात 2 टीस्पून मध घालून प्यावे. आपला रक्तदाब सामान्य करण्यासाठी काही दिवसांसाठी हा उपाय करून बघावा. आहारात योग्य तो बदल करा. मिठाचे सेवन कमी करा. भरपूर प्रमाणात नारळाचे पाणी प्या आणि स्वयंपाकासाठी खोबरेल तेल वापरा. केळी, जर्दाळू, पालक, मनुका, नारिंगी रस, झुचिनी इत्यादी पोटॅशियम समृद्ध अन्न खा. 1:1 गुणोत्तर ह्या प्रमाणात टरबूज बिया आणि खसखस बिया (खस खस) मिक्‍स करावे. हे मिश्रण घेऊन त्याची बारीक पावडर बनवा. ही पावडर 1 टीस्पून पाण्यात टाकून दिवसातून दोन वेळा घ्या – सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी आणि संध्याकाळी एकदा.
व्हिटॅमिन सी समृध्द आहार घ्या, व्हिटॅमिन सी समृध्द आहार रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करतो. उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी दररोज बीट / कोबी / कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा एक पाला ह्यांचा रस दरोराज एक कप घ्या, त्यात नायट्रेट समाविष्ट असते जे आपल्या धमन्यांना आराम देण्यास मदत करतात. रोज एक कच्चा कांदा खा. किंवा आपण कच्च्या कांद्याचा रस देखील वापरू शकता. तुळशीचा रस आणि मध हे सम प्रमाणात मिक्‍स करावे आणि दरोराज घ्यावे. उकडलेल्या मेथी दाण्यांची पेस्ट बनवा आणि दिवसातून दोनदा घ्या. सकाळी, आपण ही पेस्ट रिक्त पोटी घेतल्यास अधिक फायदा होतो. वाळलेल्या टरबूज बिया उकळवलेल्या पाण्यात घाला. हे मिश्रण गाळून दररोज 4 टीस्पून नियमित अंतराने सेवन करा.
कमी रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी घरगुती उपायांसाठी : 1 ब्लॅक पेपर आणि 1 टीस्पून लिंबाचा रस + 1/2 टीस्पून मीठ आणि 1 टीस्पून मध, एक ग्लास पाण्यात मिसळून रोज सकाळी रिक्त पोटी घ्या. अर्ध्या तासाने पालक आणि बीट रस एक ग्लासभर प्या. पांढरा भोपळा खाणे टाळा कारण त्याने रक्तदाब अजून कमी होतो. जवस + बडीशेप + वाळलेला अजमोदा (ओवा) + दालचिनी पावडर + जीरे ह्यांच एक मिश्रण तयार करून 1 टीस्पून दररोज घ्या.
दुपारपासून ते संध्याकाळी 7 वाजे दरम्यान किमान 1.5 लिटर धणे किंवा अजमोदा (ओवा) पाणी प्या. कच्चे बीट खाण्याने देखील कमी बी.पी. नियंत्रित करण्यास मदत होते. आपण बिटाचा रस देखील घेऊ शकता भारतीय स्पाइकनार्ड (जटामांसी) पाण्यातून घेतल्यास कमी बीपी नियंत्रणास खूप फायदा होतो. गरम काळ्या मिठाच्या (सेंधा) पाण्याने नियमितपणे आंघोळ करा. कमी बीपीसाठी हा सर्वात सोपा उपाय आहे. प्रथिने, जीवनसत्व बी आणि सीचे नियमित सेवन करण्याचे सुनिश्‍चित करा. 1 ग्लास पाण्यात 1/2 टीस्पून मिठ घालून प्यायल्याने रक्तदाब सामान्य करता येतो.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)