रक्‍तदान हे सर्वश्रेष्ठ दान – अमृता बाबर

कात्रज – गणेशोत्सवानिमित्त भव्य गणेश मूर्ती, आकर्षक देखावे, नेत्रदीपक रोषणाई याबरोबरच सामाजिक उपक्रम राबवण्यात उपनगरातील गणेश मंडळ पुढे सरसावल्याचे चित्र उपनगरात पहायला मिळत आहे, ही कौतुकाची बाब आहे. संतोषनगर येथील ज्वलंत हिंदुत्व मित्र मंडळच्या वतीने स्व. अजित बाबर यांच्या स्मरणार्थ रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्‌घाटन नमेश बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका अमृता अजित बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. संतोषनगर येथील ज्वलंत हिंदुत्व मित्र मंडळच्या वतीने व पुणे ब्लड बेकं हडपसर यांच्या सहयोगाने हा सामाजिक उपक्रम पार पडला. मंडळचे कार्यकर्ते व परिसरातील नागरीकांनी यात सहभाग घेतला. यावेळी 60 जणांनी रक्‍तदान केले. बाबर म्हणाल्या की, पुणे शहर व उपनगरातील वाढती वाहतूक व अपघातांचे प्रमाण खूपच वाढले आहे. त्यामुळे अपघातग्रस्त व इतर वेळी रक्‍ताची मोठी गरज भासते. अपघातील व्यक्‍तीही ही त्या कुटुंबासह समाजासाठी महत्वाची असते. त्यामुळे तात्काळ रक्‍तपुरवठा ब्लड बॅंकेच्या माध्यमातून रक्‍त पुरवले जावून निष्पाप नागरिकांचे प्राण वाचवू शकतो. रक्‍तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळे अशा उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अमृता बाबर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)