रक्‍तदान जनजागृतीसाठी दिल्या 3000 घरांना भेटी

वाकड – संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन झोन पुणे, सेक्‍टर पिंपरी अंतर्गत शाखा वाल्हेकरवाडी येथील स्वयंसेवकांनी 3000 पेक्षा जास्त घरांना घरभेटी देऊन रक्तदाना विषयी लोकांमध्ये जनजागृती केली. हे रक्‍तदान शिबीर 4 नोव्हेंबरला आहेर गार्डन मंगल कार्यालय वाल्हेकरवाडी या ठिकाणी होणार आहे. वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, चिंचवडेनगर, रजनीगंधा सोसायटी इत्यादी ठिकाणी जाऊन रक्‍तदानाची गरज व महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. या मोहिमेत शंभरपेक्षा अधिक स्वयंसेवक व सेवादल सहभागी झाले होते. ही मोहीम गेले सहा दिवस नियमित चालू असून युवा तसेच महिलांचा मोठा सहभाग होता.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपण रक्‍त तयार करू शकत नाही, त्यामुळे रक्‍तदानाच्या माध्यमातूनच ते मिळवू शकतो. मोठ्या सर्जरीच्यावेळी, गंभीर परिस्थितीसाठी, अपघातग्रस्त व्यक्‍तीस, रक्‍ताल्पतेच्या विविध आजारातील रुग्णांना, गरोदरपणात आई व बाळासाठी रक्‍ताची खूप गरज निर्माण होते. कित्येकदा आवश्‍यकतेच्या तुलनेत उपलब्ध रक्‍ताचा साठा खूपच कमी असतो, यासाठी रक्‍तदान करणे गरजेचे आहे, असे नागरिकांना समजावून सांगितले. तसेच रक्‍तदानाचे फायदे देखील सांगण्यात आले, उदाहरणार्थ रक्‍त दिल्याने हृद्‌याचे कार्य सुधारते. एका व्यक्‍तीने दिलेल्या एक युनिट रक्‍तामुळे तीन ते चार रुग्णांचे प्राण वाचू शकतात.
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यामध्ये एप्रिल 2018 पासून आत्तापर्यंत 12 शिबिरे संपन्न झाली यामध्ये 4221 युनिट रक्त संकलित केले आहे, अशी माहिती फाउंडेशनच्या मार्फत दिली गेली. तर येत्या 4 नोव्हेंबरला होणाऱ्या रक्‍तदान शिबिरामध्ये रक्‍तदान करून सर्वानी योगदान द्यावे, असे आवाहन रामचंद्र लाड (मुखी वाल्हेकरवाडी सं.नि.मं) यांच्याकडून करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)