रक्‍तदान – गैरसमजुती आणि वास्तविकता 

डॉ. मानसी पाटील 

रक्‍तदानामुळे अशक्तपण किंवा चक्‍कर किंवा त्रास होतो? 
नाही. आपल्या शरीरात 5 ते 6 लिटर रक्त असते त्यातील 350 मि.ली. रक्त म्हणजे फक्त 5 टक्के रक्त रक्‍तदानाद्वारे रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून योग्य तपासणी नंतरच स्विकारले जाते. योग्य वजन, वय, आरोग्य संबंधीचे सर्व पश्न विचारुन व हिमोग्लोबीन, रक्तदाब, नाडी तपासणीनंतरच रक्तदाता रक्‍तदान करू शकतो व रक्‍तदानाच्या वेळी किंवा नंतर अशक्तपणा येण्याची शक्‍यता नसते. रक्‍तदानानंतर आपण दैनंदिन कार्य नेहमीसारखे करु शकता. रक्‍तदात्याच्या सामान्य आरोग्यावर कोणताही पतिकूल परिणाम होत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रक्‍तदान सुरक्षित नाही? 
नाही. दान केलेले रक्त केवळ 24 तास ते 7 दिवसात नसगकरित्या भरून येते. रक्‍तदानासाठी वापरले जाणारे साहित्य पूर्णपणे र्निजतूक केलेले असते व एकदाच वापरून नष्ट केले जाते. रक्‍तदान पकियेत रक्‍तदात्याची सुरक्षितता काटेकोरपणे पाळली जाते, त्यामुळे कोणतीही इजा अथवा आजार होण्याची संभावना देखील नसते. रक्‍तदान हे संपूर्णपणे सुरक्षित आहे.

रक्‍तदानासाठी खूप वेळ लागतो? 
नाही, रक्‍तदानासाठी फक्त 10 ते 15 मिनिटे लागतात. सर्व तपासण्या रक्‍तदान, अल्पोपहार या प्रकियांसाठी काही मिनिटे लागतात. पण ही काही मिनिटे एखाद्याचे प्राण वाचवू शकतात.

रक्‍तदानाच्या वेळेस वेदना होतात? 
नाही, रक्‍तदान वेदनारहित व आनंददायी आहे. कोणत्याही दडपणाखाली न राहता हसतमुखाने सहज रक्‍तदान करता येते.

रक्‍तपेढीत रुग्णाला रक्‍त विकले जाते? 
नाही, राज्य रक्त संक्रमण परिषदेने ठरवून दिलेल्या दरातच रुग्णाला रक्त मिळते. रक्तदात्याच्या रक्ताच्या तपासणीसाठी लागणारा खर्च प्रामुख्याने यात समाविष्ट आहे. रक्तपेढी ना नफा ना तोटा या तत्वावर चालते. आपले फक्त 350 मिली रक्त आणि 15 मिनिटे, 1 ते 3 रुग्णांना जीवनदान देऊ शकतात! अशापकारे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर दरम्यान नियमित दर तीन महिन्यांनी ऐच्छिक रक्‍तदान केल्यास किमान 12 रुग्णांचे पाण वाचविण्याचे महान कार्य आपण करू शकतो. रक्तदाता आज जरी निरोगी असला तरी भूतकाळामध्ये त्याला गंभीर आजारास सामोरे जावे लागलेले असल्यास त्याच्या रक्ताची तपासणी अधिक काटेकोरपणे होणे आवश्‍यक आहे. सध्याच्या प्रदूषित वातावरणातील विषाणू हे अधिक प्रबळ असल्याने रक्तदात्याच्या रक्तामध्ये ते असल्यास त्याच्या शोध घेणे महत्त्वाचे आहे. याविषयी सांगायचे सूत्र म्हणजे जसजसे आपण विज्ञानाच्या आधारे प्रगती करत पुढे मार्गस्थ होत आहोत, तसे त्या विज्ञानाचे दुष्परिणामही आपण सोसत आहोत. त्यामुळे हा मनुष्य देह शाश्वत ठेवण्यासाठी आवश्‍यक असणा-या सर्वप्रथम गरजेची म्हणजेच शुद्ध रक्ताची तजवीज करणे किती महत्त्वाचे आहे हे लक्षात घेऊया!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)