रक्‍तदात्यांच्या संख्येत आशादायी वाढ…

जागतिक रक्‍तदान दिन विशेष


आयटीतल्या कंपन्यांचा रुग्णालयांकडे वाढता अप्रोच

पुणे – हल्लीची पिढी ही फक्‍त स्वत: पुरताच विचार करते व स्वत:मध्येच व्यस्त असते असा आरोप केला जातो. मात्र, सध्या हे विधान किमान रक्‍तदानाच्या बाबतीत तरी या पिढीने खोटे ठरवून दाखविले आहे. रक्‍तदात्यांमध्ये आयटीयन्सचा टक्‍का वाढतो आहे. आयटी कंपन्या स्वत:हून खासगी व सार्वजनिक रुग्णालयांकडे अप्रोच होऊन रक्‍तदानाचा आग्रह धरत असल्याचे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे.

आज (गुरुवारी) होणाऱ्या जागतिक रक्‍तदान दिवसाबद्दल आढावा घेतला असता याबाबची माहिती समोर आली आहे. शहरातील ससून या सरकारी रुग्णालयामध्ये होणाऱ्या शिबीरांमध्ये आयटीयन्स तसेच स्वयंसेवी संस्थांची संख्या जास्त असल्याचे तेथील डॉक्‍टर्स सांगतात. याबाबत बोलताना ससून रुग्णालयातील प्राध्यापक व डॉ. सोमनाथ सलगर म्हणाले, ससूनमध्ये साधरण दर आठवड्याला रक्‍तदान शिबीरांचे आयोजन केले जाते. यामध्ये अनेक स्वयंसेवी संस्था, इन्फोसिस सारख्या मोठमोठ्या आयटी कंपन्या आमच्याकडे शिबिराबाबत विचारणा करतात. त्यांच्या विनंतीनुसार आम्ही अनेकदा ही शिबिरे त्यांच्या कंपनीच्या कॅम्पसमध्येच आयोजित करतो व त्याला खूप चांगला प्रतिसाद आयटीयन्सकडून मिळतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डॉ. सलगर म्हणाले, रक्‍तदात्यांमध्ये अजूनही महिलांपेक्षा पुरुषांचेच प्रमाण अधिक दिसून येते आहे. महिला अनेकदा रक्‍त देण्यासाठी इच्छूक असतात परंतु त्यांचे वजन व त्यांच्या अंगात असणारे रक्‍त पुरेसे नसल्याने त्यांना रक्‍तदान करता येत नाही. मात्र हल्ली महिलांचेही प्रमाण वाढताना दिसत आहे. गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी पहाता रक्‍तदात्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसत आहे.

मागील तीन वर्षातील ससूनकडे दान केलेले रक्‍त (बॅग्ज)
2015 12960
2016 13000
2017 14502
2018 7576 (आजपर्यंत)

प्रत्येक निरोगी माणूस वर्षातून चारवेळा म्हणजे प्रत्येक तीन महिन्याने रक्‍तदान करू शकतो. एकावेळी 250 ते 300 एमएल रक्‍त काढले जाते. तीन महिन्याच्या कालावधी निरोगी माणसामध्ये तेवढे रक्‍त तयार होते. वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस या निमित्ताने करावयाचा रक्‍तदानाचा ट्रेंड सध्या वाढतो आहे. हे एक आशादायी चित्र आहे.
डॉ. सोमनाथ सलगर, ससून सर्वोपचार रुग्णालय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)