रक्षा मंत्रालयाच्या पुरस्काराबद्दल कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार

भिंगार: भिंगार येथील कॅन्टोमेंट हॉस्पिटलला रक्षा मंत्रालयाचा उत्कृष्टता पुरस्कार मिळाल्याबद्दल भिंगार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने हॉस्पिटलचे वैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे सरचिटणीस अशोक बाबर तर यावेळी कार्यक्रमाचे आयोजक भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, युवकचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र पाटील, सुभाष होडगे, अर्जुन बेरड, कॅन्टोमेंटचे माजी उपाध्यक्ष कलिम शेख, मीना मेहतानी, सुरेश मेहतानी, हंगारके, रासकर, सुदाम गांधळे, राधेलाल नकवाल, संजय खताडे, मतीन ठाकरे, दिपक लिपाणे, मंगेश मोकळ, सदाशिव मांढरे, अरुण चव्हाण, अथर्व सपकाळ आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशोक बाबर म्हणाले की, भौतिक संपत्तीपेशा मनाच्या श्रीमंतीने मनुष्य मोठा होतो. समर्पित भावनेने केलेल्या सामाजिक कार्याने जीवनात समाधान निर्माण होते. कॅन्टोमेंट हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वसामान्यांना उत्कृष्ट रुग्णसेवा मिळत असून, हे पुण्याचे काम असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कॅन्टोमेंट हॉस्पिटलचे वैद्यकिय अधिकारी डॉ.शाम जयस्वाल यांनी रक्षा मंत्रालयाच्या वतीने देशातील कॅन्टोमेंटमध्ये विविध क्षेत्रात दहा ते बारा पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार भिंगारमधील कॅन्टोमेंटला मिळाला आहे. हा पुरस्कार सर्व कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे फळ असून, त्याचे श्रेय सर्वांना जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कॅन्टोमेंट हॉस्पिटलचे वैद्यकिय अधिकारी डॉ.शाम जयस्वाल, डॉ.गितांजली पवार, सुहास जगताप, शशीकांत रायभान, भाऊसाहेब काळे, राहुल ढाकणे, प्राची पाटील, निलम परदेशी आदिंचा सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्या वाढदिवसा निमित्त हॉस्पिटलमधील रुग्णांना फळे तर रोकडेश्‍वर मंदिर येथील गरजूंना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)