#रक्षाबंधन: माझे आणि महादेव जानकर यांचे बहिण-भावाचे अतूट असे नाते – पंकजा मुंडे

परळी: आज देशभरात रक्षाबंधन हा सण साजरा केला जात आहे. बहिणीने भावाला राखी बांधून सदैव रक्षण करण्याचे वचन घेण्याचा हा सण. आपल्या भावाला दिर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करत बहिणी भावांना राखी बांधतात.
दरम्यान, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्यासोबत राखी बांधतानाचा फोटो शेअर केला आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या “माझे आणि पशूसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांचे बहिण-भावाचे अतूट असे नाते आहे. आज रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त महादेव जानकर यांना राखी बांधून परंपरा आणि संस्कृतीचा सण उत्साहात साजरा केला.”

मुंडे पुढे म्हणाल्या, “रक्षाबंधन हे एक असा बंधन आहे ज्या मध्ये विश्वास, प्रेम, आस्था समर्पण आहे. माझ्याकडे असंख्य भावांचे प्रेम व आशिर्वाद आहेत. मी माझ्या हाताने नाही बांधले तरी तुमचे माझे हे बंधन जन्माचे आहे. रक्षा हे वचन आपल्या बंधनात आहे. रक्षाबंधनाच्या माझ्या भावा-बहिणींना शुभेच्छा आणि शुभ आशिर्वाद”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)