रक्त पिपासु सरकारचा रक्तदानातून निषेध

सासवड- आमच्या पूर्वजांनी या मातीसाठी रक्त सांडले. मात्र, आज आम्हाला न्यायासाठी रक्त सांडावे लागत आहे. लोकशाही असलेल्या आपल्या देशात हिटलरशाही सुरू आहे. मराठा बांधवांना मराठा आरक्षणा करिता आत्मबलिदान करावे लागत आहे. सरकारला मराठा समाजाच्या रक्ताची चटक लागली आहे का? हे सरकार रक्त पिपासु बनले आहे का? असा सवाल करत शनिवारी मराठा बांधवांनी रक्तदान करून सरकारचा निषेध केला.
एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतो देणार नाही घेतल्या शिवाय राहणार नाही, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचं या घोषणांनी सासवडचे शिवतीर्थ दणाणून सोडले. मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी सासवडला बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. पुरंदर तालुक्‍यातील प्रत्येक गावातील मराठा बांधव एक दिवस आंदोलनात सहभागी होत आहेत. शनिवारच्या आंदोलनाच्या 10व्या दिवशी वनपुरी-उदाचीवाडी गावचे मराठा बांधवांनी रक्तदान करून सरकारचा निषेध केला. यावेळी 65 मराठा रक्तदात्यांनी रक्तदान केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)