रक्तदाब आणि “लो सोडियम’ मीठ

सध्याच्या वेगवान जीवनातील स्पर्धेत टिकण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांना कृत्रिम साखर अथवा सॅकरीन सहजपणे उपलब्ध असते. मात्र, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना मिठाला पर्याय सापडलेला नाही असं वाटतं. रक्तामधलं मीठ (सोडियम क्‍लोराईड) हे पाणी धरुन ठेवतं आणि त्यामुळे रक्तामधलं पाण्यांच प्रमाण वाढतं म्हणूनच या नेहमीच्या आहारातील मिठाऐवजी काय वापरायला हवं, याचा वेध घेतला आहे. त्यामध्ये सैंधवासह “लो सॉल्ट’चाही समावेश आहे.
असं म्हटलं जातं, की माणूस एकवेळ सोने-नाण्याशिवाय राहू शकेल पण मिठाशिवाय नाही! पूर्वी मिठाचा मोठ्या प्रमाणावर व्यापार चालायचा आणि मिठाला सोन्याइतकाच भाव मिळायचा! काही प्राचीन संस्कृतींमध्ये मीठ नाण्यांमध्ये भरून त्याचा चलनामध्ये वापर केला जात असे. मिठासाठी अनेक युद्धेदेखील खेळली गेली आहेत… भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातला “मिठाचा सत्याग्रह’ कोण विसरेल? अगदी अलिकडेपर्यंत तर दुकानात मीठ विकत नसत. किराणा यादीमध्ये खडे मिठाची एक पुडी वाढवली जात असे. एखाद्याच्या उपकाराचे स्मरण करताना आपण “मिठाला जागतो’ ना?
असे हे गौरवशाली मीठ आपल्या आहारात इतके मुरलेले आहे की त्याच्याशिवाय जगण्याची कल्पनासुद्धा करावीशी वाटणार नाही. जगाच्या पाठीवर कोठेही जा, प्रत्येकाच्या आहारात मीठ असतेच. पण गेल्या 20 वर्षात या मिठाचा वापर अनेक पटींनी वाढला आहे आणि त्याबरोबरच उच्चरक्तदाबाचे प्रमाणही! त्यामुळे मीठ खावे का नाही, किती खावे? कोणत्या प्रकारचे खावे? असे मूलभूत प्रश्‍न आपल्याला पुन्हा पडायला लागले आहेत.
उच्चरक्तदाब असणाऱ्या देशपांडे काकांनी मला एकदा विचारले, “मी दररोज किती मीठ खाऊ शकतो?’ बऱ्याच दिवसांपासून वजन आणि रक्तदाब कमी करण्यासाठी त्यांचे आहारनियंत्रण सुरू होते. अखेर सहा महिन्यांनी का होईना, त्यांनी हा प्रश्‍न विचारल्यामुळे मलाच बरे वाटले! पण केवळ एका वाक्‍यात उत्तर देण्याचा मोह मी आवरता घेतला. त्यांना हे सांगणे आवश्‍यक होते की मीठ खाणे ही समस्या नसून मिठातील “सोडियम’ हा खरंतर रक्तदाबासाठी त्रासदायक घटक आहे… मी म्हटले, “देशपांडे काका, तुम्ही खरंच खूप महत्त्वाचा प्रश्‍न विचारलात! आपण या प्रश्‍नाच्या अगदी मूळापासून सुरुवात करुया.’
मीठ म्हणजे सोडियम-क्‍लोराईड. यात सोडियम 40% तर क्‍लोराईड असते 60%.
सोडियम शरीरात काय काम करते?
सोडियम आपल्या मज्जातंतूंना उत्तेजित करते आणि मेंदू-स्नायूंदरम्यान निरोपाची देवाण-घेवाण करण्यास मदत करते.
मिठातील “सोडियम’ आणि “क्‍लोराईड’ अन्नाच्या पचन प्रक्रियेत, विशेषतः प्रथिनांच्या पचनात महत्वाची भूमिका बजावतात.
“सोडियम’ शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावते. यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाणही नियंत्रित रहाते.
याचाच अर्थ असा की मीठ हा आहारातील महत्वाचा आणि उपयुक्त घटक आहे; पण प्रमाणात असेल तरच! मीठ जास्त घेतले तर शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढू शकते आणि त्याची परिणती रक्तदाब वाढणे, शरीरावर सूज येणे यात होऊ शकते.
आता आपला प्रश्‍न…
रोज किती मीठ खायचे?
“सर्वसाधारण निरोगी व्यक्तीसाठी एका दिवसाला चहाचा एक चमचा भरून ( पाच ग्रॅम) मीठ म्हणजेच 2300 मिलीग्रॅम सोडियम पुरेसे ठरते. रक्तदाब वाढलेला असेल तर डॉक्‍टरांनी/आहारतज्ञांनी सांगितल्याशिवाय मीठ बंद करायची गरज नाही. पण त्याचे प्रमाण मात्र कमी करावे लागते. उच्चरक्तदाबासाठी वापरली जाणारी काही औषधे मूत्रपिंडांच्या कार्यावर परिणाम करतात आणि मूत्रामार्गे प्रमाणापेक्षा जास्त सोडियम बाहेर टाकतात. अशावेळी आहारातले मीठ कमी करावे लागत नाही,’ मी देशपांडे काकांना सांगत होते.
उच्चरक्तदाबाशिवाय मूत्रपिंडे व यकृताचे काही आजार, अंगावर आलेली सूज अशा काही प्रसंगांमध्ये देखील मिठाचे प्रमाण कमी करावे लागते. त्यामुळे मिठाचे प्रमाण फक्त रक्तदाबावरून ठरवता येत नाही; तर त्यासाठी पूर्ण चित्रच स्पष्ट व्हावे लागते.
सर्वात महत्वाचे म्हणजे, स्वयंपाकातील मिठाबरोबरच आहारातील अनेक पदार्थांमध्ये वापरलेले सोडियम आपण विचारात घेतले पाहिजे. विशेषतः साठवणीचे पदार्थ जसे की, पापड, वेफर्स, लोणची, सॉस-जॅम आणि ब्रेड-बिस्कीटे, खारी, टोस्ट. केक अशा बेकरीतील पदार्थांमध्ये अतिरिक्त प्रमाणात वापरले जाणारे सोडियम लक्षात घेतले पाहिजे.
“मग मी सैंधव मीठ वापरू का?’
देशपांडे काकांची चौकस बुद्धी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती!
मिठाचे जरी अनेक वेगवेगळे प्रकार असले तरी मी त्यांना महत्वाच्या आणि नेहमी वापरल्या जाणाऱ्या प्रकारांबद्दल माहिती देण्याचे ठरवले.
प नेहमीच्या वापरातले (पांढरे) मीठ – या मिठात आयोडिन मिसळलेले असते.
प सैन्धव मीठ – या मिठात सोडियमचे प्रमाण थोडे कमी तर इतर जवळपास प्रकारची खनिजद्रव्ये अतिसूक्ष्म प्रमाणात आढळतात. आयुर्वेदानुसार हे मीठ मधुमेह, हृदयविकारासाठी, हाडांच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असते.
प काळे मीठ – हे लोह आणि पोटॅशियमयुक्त असून यातही सोडियमचे प्रमाण नेहमीच्या मिठापेक्षा जरासे कमी असते.
हे सांगून झाल्यावर मी एका वाक्‍यात त्यांना त्यांच्या प्रश्‍नाचे उत्तर दिले – “सैन्धव मीठ सर्वकाळ वापरणे चांगलेच आहे, पण नेहमीचे (पांढरे) मीठ वापरणे पूर्णपणे थांबवू नका. आणि कोणतेही मीठ वापरले तरी दिवसाचे प्रमाण लक्षात ठेवा!”
“हल्ली लो-सोडियम मीठ मिळते
ते वापरावे का?’
देशपांडे काकांचा पुढचा प्रश्‍न तयारच होता! मला या “लो सोडियम मिठा’तले रसायनशास्त्र डोळ्यासमोर दिसायला लागले. त्याची होणारी जाहिरातबाजी, हे शास्त्र लोकांपर्यंत पोचवू शकणार नव्हती. या मिठात सोडियम कमी करण्यासाठी पोटॅशियम वापरले असते. पोटॅशियम जरी हृदय आणि स्नायूंसाठी चांगले असले, तरी जास्तीचे पोटॅशियम रक्तात साठून त्याचे दुष्परिणाम होतात (उदा. शरीराला कंप सुटणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे). उच्चरक्तदाब असणाऱ्या ज्या व्यक्ती अउए ळपहळलळीीीं किंवा अठइ (अपसळीेंशपीळप ीशलशिीीं लश्रेलज्ञशीी) प्रकारची औषधे घेतात त्यांना लो-सोडियम मीठ चालत नाही. इतरांना ते उपयोगी ठरू शकते. पण ज्यांना मधुमेह अथवा मूत्रपिंड किंवा यकृताचे आजार आहेत अशांनी हे मीठ टाळायलाच हवे.
देशपांडे काका लक्षपूर्वक ऐकत होते. त्यांना अउए ळपहळलळीीीं प्रकारची औषधे सुरू असल्यामुळे “लो सोडियम मीठ’ चालणार नाही हे मी समजावून सांगितले. नेहमीच्या वापरातले (पांढरे) मीठच त्यांच्यासाठी योग्य होते. त्यांना मी पोटॅशिअम अधिक प्रमाणात असणारे काही अन्नपदार्थदेखील वर्ज्य करायला सांगितले.
निघता निघता देशपांडे काकांनी उजळणीरूपात या सगळ्याचा सारांश सांगून माझे काम सोपे करून टाकले! त्यामुळे हे सांगावेसे वाटते की, मधुमेही व्यक्ति जसा साखरेच्या सेवनाबाबत जागरुक असतो, त्या धर्तीवर उच्च रक्तदाबाच्या रुग्णाने मिठाच्या सेवनाबाबत अत्यंत जागरुक असणे आवश्‍यक आहे. अन्यथा मीठ ही एक मोठी समस्या बनू शकते. ते टाळणे आपल्याच हातात आहे.
मिठाच्या वापराबाबत महत्त्वाचे…
प सर्वसामान्य निरोगी व्यक्तींनी दररोज फक्त चहाचा एक चमचा भरून (5 ग्रॅम) मीठ घेणे पुरेसे आहे (यात पॅकबंद व साठवणीच्या पदार्थातले मीठ देखील मोजायला हवे!).
प उच्चरक्तदाब असणाऱ्यांनी गरजेनुसार आहारातले मिठाचे प्रमाण कमी करावे व हे प्रमाण डॉक्‍टर व आहारतज्ञांच्या सल्ल्याने ठरवावे.
प लो-सोडियम मीठ उच्चरक्तदाब असणाऱ्या सर्वच व्यक्तींसाठी चांगले नाही.
प सैंधव, काळे मीठ अशी इतर प्रकारची मिठे वापरण्यापूर्वी त्यांमधील इतर घटक समजून घेणे व ते आपल्यासाठी उपयुक्त आहेत की नाही याची खात्री करणे आवश्‍यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)