रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान -अविनाश राऊत

शिक्रापूर -नागरिकांना जीवन जगत असताना रक्ताची जास्त गरज असून रक्तदान करून रक्त उपलब्ध होत असल्यामुळे अनेकांचे प्राण देखील वाचले जात आहेत. कित्येकांना जीवनदान मिळत आहे त्यामुळे रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान असल्याचे मत अविनाश राऊत यांनी व्यक्त केले.
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे सेको टूल्स इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीमध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ केंद्र सणसवाडी यांच्या वतीने व पुणे ब्लड बॅंक हडपसर यांच्या सहकार्याने नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ केंद्र सणसवाडीचे केंद्र संचालक अविनाश राऊत बोलत होते. याप्रसंगी सेको टूल्स इंडिया प्रायवेट लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापक प्रतीक्षा भोसले, प्रशांत बेकल, उमाकांत घाटे, युनियन खजिनदार रामचंद्र फुलारी, युनियन अध्यक्ष रमेश सातपुते, युनियन सेक्रेटरी भाग्येश पाटील, मीना गागरे, सुनील कामठे यांसह आदी उपस्थित होते. तर यावेळी बोलताना रक्ताची गरज कधीही कोणालाही पडू शकते आणि एका रक्तदात्याने रक्तदान केल्याने कोणाचा तरी जीव नक्कीच वाचू शकतो त्यामुळे नागरिकांनी देखील रक्तदान करणे गरजेचे असल्याचे मत प्रतीक्षा भोसले यांनी व्यक्त केले. तर यावेळी कंपनीतील एकशे चार कामगारांनी रक्तदान केले. सूत्रसंचालन मीनाक्षी गागरे यांनी केले तर प्रशांत बेकल यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)