रक्तदान करा; खरेखुरे हिरो बना!!! (भाग एक)

हिरो म्हटलं की डोळ्यासमोर येते संकटात असणाऱ्यांचे प्राण वाचवणारी व्यक्ती! रक्तदान करून आपण सर्वच जण असे हिरो बनू शकतो! रक्तदान म्हणजे जणूकाही निःस्वार्थीपणे दिलेली एक प्राणदायी भेटवस्तूच. रक्तदानाबाबत सगळेच बोलतात, पण अनेकांना त्यासाठी काय काळजी घ्यावी लागते याची माहिती नसते. अनेकांच्या मनात अनेक शंका असतात. रक्तदान कोण करू शकते, रक्तदानासाठी काय तयारी लागते, रक्तदानाचे काही दुष्परिणाम आहेत का, अशा साध्या-सोप्या पण महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे या लेखातून समजून घेऊयात.

रक्तदान कोण करू शकते?

ज्यांचे वजन 50 किलोपेक्षा जास्त आहे अशा 18 वर्षावरील सर्व निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकतात. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला कोणताही संसर्गजन्य रोग नसावा. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीने मागील 120 दिवसांमध्ये (4 महिन्यांमध्ये रक्तदान (whole blood donation) केलेले नसावे. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचे नाडीचे ठोके मिनिटाला 50 ते 100 यामध्ये असावेत.रक्तदानापूर्वीचा रक्तदाब सिस्टोलिक 100-180 ाकस मध्ये आणि डायस्टोलिक 50-100 मध्ये असावा.

-Ads-

रक्तदान कोण करू शकत नाही?

रक्तदात्याच्या आणि ज्याला रक्त द्यायचे आहे अशा व्यक्तीच्या सुरक्षेच्या दृष्टीने खालील नियमावली आहे.

   वैद्यकीय कारणे

एच.आय.व्ही., काविळ (ब आणि क प्रकारची), फेफरे येणे, मधुमेह बाधित व्यक्ती रक्तदानास पात्र नाहीत. मलेरिया, डेंग्यू झाला असताना आणि त्याचे उपचार सुरू असताना, व त्यानंतर 3 महिने रक्तदान करता येत नाही.
सर्दी, खोकल्यासारखे संसर्गजन्य आजार झाले असताना, पोट बिघडले असताना रक्तदान करू नये.  ऍक्‍युपंक्‍चर, टॅटू, कान टोचणे यासारख्या प्रकारांनंतर 6 ते 12 महिने रक्तदान करू नये. दातांच्या किरकोळ उपचारांनंतर 24 तास व मोठ्या उपचारांनंतर 1 महिना रक्तदान करू नये.

किरकोळ शस्त्रक्रियेनंतर (Arthroplastya, Breast Bioscopy मोतिबिंदू) 2 महिने, मोठ्या शस्त्रक्रियेनंतर (Total Knee Replacement, Cardiac Surgeries, Organ Transplant Surgeries) 6 महिने आणि एन्डोस्कोपीनंतर 4 महिने रक्तदान करू नये. रक्तदानापूर्वी आपण घेत असलेल्या औषधांची माहिती (विशेषतः आधीच्या 2 दिवसात घेतलेल्या) देणे आवश्‍यक आहे. उदा.  Aspirin, Ibuprofen and Antibiotics

      इतर कारणे

श्रमागील 24 तासात मद्यपान केले असल्यास रक्तदान करू नये. श्ररक्तदानापूर्वी दोन तास धूम्रपान करू नये.श्ररक्तदान करू इच्छिणाऱ्याला जर काहीकारणास्तव रक्त घ्यावे लागले असेल, तर त्यानंतर किमान 12 महिने रक्तदान करू नये.श्ररक्तदाता जर इतर देशांत प्रवास करून आला असेल (विशेषतः जिथे मलेरिया, झिका व्हायरससारख्या रोगांचा प्रादुर्भाव असतो) तर पुढील 6 महिने रक्तदान करू नये.

डॉ. मानसी पाटील


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)