रक्तदानातून सामाजिक बांधीलकी निर्माण होते ः सरपंच उबाळे

वाघोली- विविध आजार व वाढलेले अपघात यांमुळे रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज असते. रुग्णाला वेळेत रक्त मिळाल्यास जीवदान मिळते, म्हणून रक्तदानातून सामाजिक बांधीलकी निर्माण
होते, यासाठी नागरिकांनी रक्तदान करावे, असे प्रतिपादन वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे यांनी केले .
रॉयल गुलमोहर पार्क सोसायटी, योग संस्कृती हेल्थ फाउंडेशन आणि ग्लोबल टीम फाउंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 28 जणांनी रक्तदान केले, तर 110 जणांची रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी
करण्यात आली. यावेळी उबाळे बोलत होत्या . यावेळी उपसरपंच संदीप सातव, ग्रामपंचायत सदस्य अर्चना कटके, जयप्रकाश सातव, शिवदास उबाळे, शांताराम कटके, देवराम तांबे, दत्तात्रय कटके, ससून रक्तपेढीचे डॉ प्रिया बागले, किरण ठाकरे, जितेंद्र सोनवणे, गोरक्ष टिंगरे, शंकर खाटपे, विजय फापाळे व नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर खाटपे यांनी केले, स्वागत विजय फापाळे यांनी आणि सूत्रसंचालन योगतज्ज्ञ संतोष देशमुख यांनी केले. गुलाब लाळगे, बाळासाहेब जाधव, गोकुळ शिरोरे, अशोक अकोलकर , श्री राऊत, शरद रोगे, अमोल नारखेडे आणि सदस्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)