रक्तदानातच आनंद 

डॉ. जयदीप महाजन 

एकविसाव्या शतकात मानवाने सर्वच क्षेत्रात अनेक शोध लावले आहेत. शरीरात कृत्रिम अवयव बसविले जातात; परंतु कृत्रिम रक्त तयार करण्याचे तंत्र मानवाने अद्याप आत्मसात केलेले नाही. मानवी रक्तावर प्रक्रिया करतो त्याचे विघटन करू शकतो. परंतु प्रत्यक्षात रक्त तयार करू शकत नाही. त्यामुळे मानवी रक्ताला पर्याय सापडलेला नाही. मानवी रक्त फक्त मानवी शरीरातच तयार होते. रक्तामुळे माणसाचे प्राण वाचविले जातात.

सुरक्षित रक्त रुग्णाला मिळवून देण्यासाठी स्वैच्छिक रक्तदान महत्त्वाचे ठरते. ही मोहीम व्यापक करून रक्तदानाचे महत्त्व लोकांना सांगण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर जनजागृती करीत आहे. या मोहिमेसाठी या वर्षाचे घोषवाक्‍य आहे रक्तदानातच आनंद आहे! राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस सर्वप्रथम 1975 साली इंडियन सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन ऍण्ड इम्युनो हिमॅटोलॉजी द्वारे व्यक्तीच्या जीवनात रक्ताची आवश्‍यकता व रक्ताचे महत्त्व यासाठी साजरा करण्यात आला. इंडियन सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन ऍण्ड इम्युनो हिमॅटोलॉजीची स्थापना 22 ऑक्‍टोबर 1971 साली के. स्वरूप क्रिशेन आणि डॉ.जे. जी. ज्वाली यांच्या नेतृत्वात झाली.

रक्तदाता रुग्णाचे प्राण वाचविणारा देवदूतच – 

रक्त हे कुठल्याही प्रयोग शाळेत अथवा कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही तर ते तयार होते. तुमच्या आमच्या मानवी शरीरात, प्राण्यांचे रक्त माणसाला चालत नाही, म्हणूनच माणसाचा जीव वाचविण्यासाठी माणसाचे रक्त द्यावे लागते. आपण कोणत्या कारणासाठी, कोणासाठी रक्तदान करतो हे रक्तदात्यास माहीत नसते. पण आपल्या रक्तदानाने कुणाचा तरी जीव वाचेल, ही सामाजिक व राष्ट्रीयभावना लक्षात ठेवून अनोळखी लोक सुध्दा एकत्र येतात. यासाठी ज्यांनी स्वैच्छिक रक्तदान 25, 50, 75, 100 वेळा त्यापेक्षा जास्त अशा रक्तदात्यांचा रुग्णाचे प्राण वाचविण्यात फार मोलाचा वाटा आहे. त्याचा सन्मानही केला जातो. रक्तदाता हा रुग्णाचे प्राण वाचविणारा देवदूतच होय. डॉ. बर्नार्ड फैन्टस यांनी संयुक्त राज्य अमेरिकेत प्रथम कुक काउंटी हॉस्पिटल शिकागो (अमेरिका) येथे 1937 साली रक्तदात्याचे रक्त सुरक्षित व संकलन करण्यासाठी व रक्त बॅंक शब्दाचा प्रयोग करुन पहिली ब्लड बॅंक (रक्तपेढी) स्थापना केली.

रक्तगटाचा शोध – 

1) एबीओ रक्तगटाचा शोध 1901 साली कार्ल लॅड स्टेनर यांनी लावला.

2) एबी रक्तगटाचा शोध ए. डिकास्ट्रीलो व ए. स्टुर्ली यांनी 1902 मध्ये लावला.

3) आरएच फॅक्‍टरचा शोध अेलेझांडर विनर यांनी 1937 मध्ये लावला.

4)डॉ. वाय.एम.भेंडे (मुंबई) – 1952 मध्ये बॉम्बे ब्लडग्रुपचा शोध लावला.

रक्तदानाचे फायदे – 

1) रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते.

2) रक्तदाब, हृदयरोग व कर्करोग सारख्या आजारांच्या धोक्‍याचे प्रमाण कमी होते.

3) बोनमॅरोमध्ये नवीन रक्त तयार करण्याची क्षमता वाढते व रोगप्रतिकारक शक्ती वाढून नवचेतना निर्माण होते.

4) रक्ताद्वारे शरीरात ऑक्‍सिजन पुरवला जातो व कार्बनडायऑक्‍साईड बाहेर पडण्यास मदत होते.

5) नियमित रक्तदानाने शरीरातील लोहाचे प्रमाण आवश्‍यकतेपेक्षा जास्त वाढत नाही. त्यामुळे हृदय यकृतासारखे अवयव स्वस्थ राहतात.

6) एका वेळी रक्तदानाने शरीरातील 650 कॅलरीज कमी होतात.

7) लालपेशी शरीरात अभिसारण प्रक्रियेत 120 दिवस लागतात.

8) रुग्णाचे प्राण वाचविण्याचे समाधान मिळते.

ऐच्छिक रक्तदान विषयी जागृती – 

रक्तदान हे संपूर्ण सुरक्षित वेदनारहित व आंनददायी आहे. रक्तदान प्रक्रियेत रक्तदात्याची सुरक्षितता पाळली जाते.

दान केलेले रक्त 24 तास ते 7 दिवसात नैसर्गिकरीत्या झिज भरून निघते.

रक्त हे फार काळ साठविता येत नाही. त्यामुळे सतत रक्ताची गरज भासते.

रक्तदान वेळी अथवा नंतर अशक्तपणा येण्याची शक्‍यता कमी असते. आपले दैनंदिन कार्य नेहमीप्रमाणे करू शकता.

रक्तदात्याच्या सामान्य आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही.

थॅलेसेमिया सिकलसेल (आजाराने ग्रस्त बालकांना) तसेच पंडुरोग (ऍनेमिया), प्रसुतीवेळी, अतिरक्तस्त्राव, शस्त्राक्रिया, कर्करोग इ. साठी नेहमीच रक्ताची गरज असते. त्यासाठी जास्तीत जास्त स्वैच्छिक रक्तदान महत्त्वाचे ठरते.

रक्ताची संपूर्ण चाचणी (एच.आय.व्ही., कावीळ बी आणि सी, गुप्तरोग, मलेरिया, रक्तगट क्रॉसमॅच इ.) करुनच रुग्णास रक्तपुरवठा केला जातो.

रक्तदान करण्यासाठी आवश्‍यक बाबी- 

1) वय 18 वर्षे पूर्ण – 60 वर्षापर्यंत, हिमोग्लोबिनचे प्रमाण 12.5 ग्रॅमच्या वर, वजन 45 कि.ग्रॅ. च्या वर, संपूर्ण वैद्यकीय तपासणी (रक्तदाब, नाडी, वजन इ.), रक्तदानास 10 ते 15 मिनिटे लागतात.

2) दर तीन महिन्यांनी शासन मान्यताप्राप्त रक्तपेढी व रक्तदान शिबिरात रक्तदान करू शकता.

3) आपल्या शरीरात 5 ते 6 लिटर रक्त असते. त्यापैकी 350 मि.ली. रक्त म्हणजे 5 टक्केच घेतले जाते.
रक्त व रक्त घटक (कंपोनंट सेप्रेशन) रक्तदान केलेल्या एका युनिटमधून खालील रक्तघटक 6 ते 8 तासांच्या आत वेगवेगळे केले जातात. यालाच रक्त विघटन (कंपोनंट सेप्रेशन) म्हणतात.

रक्त घटक साठवण दिवस तापमान रुग्णांसाठी वापर पुढीलप्रमाणे- 

1.) तांबड्यापेशी (आरबीसी) 35 दिवस (झउत उझऊ(ड्‌) 42 दिवस 2 – प्रसुतीवेळी, ऍनेमिया थॅलेसेमिया, सिकलसेल, हिमोफिलिया इ.

2.) पांढऱ्या पेशी – 1 वर्षे – जळलेले रुग्ण अतिरक्तस्त्राव, रक्ताच्या उलट्या, यकृत इ.

3.) रक्तबिंबिका (प्लेटलेट्‌स) 5 दिवस 22 औ 20ल डेंगू, लेप्टी, मलेरिया, रक्तस्त्राव

4.) क्रायोप्रेसिप्रिटेड- 5 वर्षे अलब्युमिन, इम्युनोग्लोबोलिन इ.

आपण समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने आपण स्वेच्छिक रक्तदान करून रक्तदाता म्हणून सहभागी होऊन आपले मित्र नातेवाईक यांना रक्तदानासाठी प्रवृत्त करावे. देशात व महाराष्ट्रात, वर्ड हेल्थ ऑर्गनायझेशन राष्ट्रीय रक्तसंक्रमण परिषद, राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण संस्था इ. मार्फत महाराष्ट्रात महाराष्ट्र शासन, राज्य रक्तसंक्रमण परिषद, यांच्या अधिपत्याखाली जिल्हा रुग्णालय, महानगरपलिका, महाविद्यालय, धर्मदाय, रेडक्रॉस, स्वयंसेवी संस्था, सामाजिक सेवाभावी संस्था इ. मार्फत प्रभातफेरी, विविध वृत्तपत्र, इलेक्‍ट्रॉनिक मीडिया, भारूड इ. मार्फत स्वैच्छिक रक्तदान मोहीम जनजागृती केली जाते म्हणूनच म्हणतात रक्तदानातच आनंद आहे!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)